TRENDING:

Silver Rate Crash: चांदी बाजारात थरकाप, वर्ल्ड बँकेने सांगितले, मोठा क्रॅश येणार; घाई केली तर फसाल

Last Updated:
Global Silver Prices: जागतिक बाजारात चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ सुरू असून MCX वर चांदी आणि सोने दोन्हीमध्ये तीव्र घसरण दिसून आली आहे. आघाडीच्या गुंतवणूक बँकेने चांदी आणखी मोठ्या प्रमाणात कोसळू शकते असा इशारा दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये तणाव वाढला आहे.
advertisement
1/8
चांदी बाजारात थरकाप, वर्ल्ड बँकेने सांगितले, मोठा क्रॅश येणार; घाई केली तर फसाल
जागतिक बाजारात चांदीबाबत मोठी उलथापालथ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. MCX वर सोने-चांदी दोन्हीमध्ये घसरण दिसून आली असून चांदी तब्बल 9,000 रुपयांनी प्रति किलो स्वस्त झाली आहे. सोन्याचाही दर 10 ग्रॅममागे सुमारे 1,370 रुपयांनी खाली आला आहे. अशा वेळी चांदी खरेदीची संधी शोधणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
2/8
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 80 डॉलर प्रति औंसच्या वर टिकू शकलेली नाही. याच पार्श्वभूमीवर TD Securities या आघाडीच्या गुंतवणूक बँकेने चांदीबाबत थेट ‘घसरणीचा इशारा’ दिला आहे. बँकेने मार्च सिल्व्हर फ्युचर्समध्ये शॉर्ट पोजिशन घेतली असून चांदी 40 डॉलरपर्यंत घसरू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच पुढील काही महिन्यांत चांदीचे दर जवळपास अर्ध्यावर येऊ शकतात.
advertisement
3/8
TD Securities चे सीनियर कमोडिटी स्ट्रॅटेजिस्ट डॅनियल यांनी 78 डॉलर प्रति औंस दराने मार्च फ्युचर्समध्ये शॉर्ट पोजिशन घेतली आहे. पुढील तीन महिन्यांत मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याचा त्यांचा दावा आहे. मागील काही महिन्यांत चांदी 84 डॉलर प्रति औंसच्या उच्चांकावर पोहोचली होती.मात्र आता ती तेजी थंडावत असल्याचे चित्र आहे.
advertisement
4/8
जर बँकेचा अंदाज खरा ठरला, तर चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा मोठा ‘संधीचा काळ’ ठरू शकतो. मात्र फक्त स्वस्त दर पाहून लगेच खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. कारण सध्या चांदीचा बाजार प्रचंड अस्थिर आहे. दिवसेंदिवस नव्हे तर तासागणिक दर बदलत आहेत. 80 डॉलरचा आधार तुटल्यानंतर चांदी 78 डॉलरखाली घसरली आहे.
advertisement
5/8
या घसरणीमागे दोन महत्त्वाच्या कारणांची चर्चा आहे. पहिले कारण म्हणजे इंडेक्स रिबॅलन्सिंग. पुढील दोन आठवड्यांत Comex सिल्व्हर मार्केटमधील सुमारे 13 टक्के ओपन इंटरेस्ट विक्रीसाठी येऊ शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणातील विक्रीमुळे दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.
advertisement
6/8
दुसरे कारण अमेरिकेतील धोरणात्मक अनिश्चितता. ट्रम्प प्रशासन चांदीवर आयात शुल्क (टॅरिफ) लावेल की नाही, या भीतीमुळे गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात चांदी अमेरिकेतच अडकून पडली आहे. TD Securities चा अंदाज आहे की टॅरिफ लागणार नाहीत. तसे झाले, तर ही चांदी पुन्हा जागतिक बाजारात येईल आणि दरांवर आणखी दबाव वाढू शकतो.
advertisement
7/8
चांदीत गुंतवणूक करण्याचा विचार असेल, तर घाई टाळणे महत्त्वाचे आहे. दर सध्या उतरणीला लागले असून मोठ्या घसरणीचा अंदाज खुद्द बँकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे थोडा संयम ठेवणे नुकसानकारक ठरणार नाही.
advertisement
8/8
याआधीही TD Securities ने ऑक्टोबरमध्ये अशीच शॉर्ट पोजिशन घेतली होती. मात्र त्यावेळी चांदीचे दर वाढले आणि बँकेला सुमारे 2.4 मिलियन डॉलरचे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे एकाच अहवालावर संपूर्ण निर्णय घेणे टाळावे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Silver Rate Crash: चांदी बाजारात थरकाप, वर्ल्ड बँकेने सांगितले, मोठा क्रॅश येणार; घाई केली तर फसाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल