Women Success Story: नोकरीला केला रामराम, 5 हजारात सुरू केला ब्रँड, आता महिन्याला 1 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Women Success Story: ममता कांबळे यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या व्यवसायातून आज दरमहा 1 लाख रुपयांहून अधिक कमाई सुरू केली आहे.
advertisement
1/7

सध्याच्या घडीला अनेक महिला व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. बदलापूरच्या ममता कांबळे यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या सुगंधी मेणबत्त्यांच्या व्यवसायातून आज दरमहा 1 लाख रुपयांहून अधिक कमाई सुरू केली आहे.
advertisement
2/7
7K Candle या नावाने त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला असून, त्यांच्या कँडल्स आणि रूम फ्रेशनर्सची मागणी देशभरातच नव्हे तर स्वित्झर्लंड, कॅनडा, अमेरिका अशा परदेशांमधूनही होत आहे.
advertisement
3/7
मुळात एका खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या ममता कांबळे यांना नेहमीच काहीतरी स्वतःचं करण्याची खंत वाटत होती. शेवटी त्यांनी नोकरीला रामराम ठोकत उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला.
advertisement
4/7
त्यांनी घरूनच सुगंधी मेणबत्त्या तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात काम सुरू केलं, मात्र दर्जा आणि वेगळेपणावर भर दिल्यामुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला.
advertisement
5/7
7K Candle या ब्रँडअंतर्गत आज विविध प्रकारच्या आकर्षक आणि दर्जेदार सुगंधी मेणबत्त्या, रूम फ्रेशनर्स उपलब्ध आहेत. या उत्पादनांची खासियत म्हणजे त्यातील सर्जनशील डिझाईन्स आहेत.
advertisement
6/7
मोदक, मोतीचूर लाडू, काजू कतली, विविध फुलांचे बुके, चहा-बिस्किटं, कॉफी अशा थीम्समध्ये तयार केलेले मेणबत्त्यांचे सेट आहेत. यामध्ये नैसर्गिक घटक आणि सुगंधी तेलांचा वापर करण्यात येतो, त्यामुळे हे उत्पादन पर्यावरणपूरकही ठरते.
advertisement
7/7
घर, ऑफिस तसेच गिफ्टिंगसाठी या उत्पादनांची मागणी वाढत असून सण-उत्सवांच्या काळात तर विक्री दुपटीने वाढते. ममता कांबळे यांचा प्रवास हे कमी गुंतवणुकीतून मोठं यश मिळवण्याचं आणि आत्मविश्वासाच्या बळावर उभं राहण्याचं उत्तम उदाहरण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Women Success Story: नोकरीला केला रामराम, 5 हजारात सुरू केला ब्रँड, आता महिन्याला 1 लाख कमाई