Mumbai Land Price : पणजोबांनी फक्त 10 रुपये खरेदी केली असती तर आज तुम्ही कोट्यधीश असता
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mumbai Property:जर तुमच्या आजोबांनी तेव्हा फक्त 100 रुपयात मुंबई जमीन खरेदी केली असतील तर तुम्ही आज करोडपती असता. 100 वर्षांपूर्वी मुंबईत जमीन केवळ 3 रुपये प्रति 9 चौ. फूटाने मिळत होती.
advertisement
1/9

कुठे पैसा गुंतवला तर जास्त रिटर्न मिळतील याचे उत्तर कदाचित तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड असे द्याल. किंवा सोन्यातील गुंतवणूक ही जास्त चांगली असे ही काही जण म्हणतील. पण या सर्वांपेक्षा अशी एक गुंतवणूक आहे जी सर्वात जास्त फायद्याची ठरते आणि ती म्हणजे जमीन होय. गेल्या काही दिवसात मुंबईतील मोठ्या जमीन आणि घर खरेदीच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण ही आताची परिस्थिती झाली. मुंबईतील जागांच्या किमती नेहमी इतक्या महाग नव्हत्या.आज कोणाचा विश्वास बसणार नाही. पण फक्त १० रुपयात जर कोणी मुंबईत जमीन खरेदी केली असती तर आज ती व्यक्ती कोट्यधीश झाली असती. होय तुम्ही अगदी बरोबर वाचले फक्त दहा रुपये...ज्या 10 रुपयात आज फक्त अर्धाकप चहा मिळतो.
advertisement
2/9
आजच्या काळात जर तुम्ही चहा प्यायला गेलात, तर किमान 10 रुपये खर्च करावे लागतात. बहुतेक लोक ही छोटी रक्कम दुर्लक्ष करून म्हणतात- अरे, 10 रुपयांनी काय होतं? पण कल्पना करा, जर 100 वर्षांपूर्वी तुम्ही 10 रुपये वाचवून जमीन खरेदी केली असती, तर आज तुम्ही कोट्यधीश झाला असता.
advertisement
3/9
आज मुंबईतील जे परिसर महागडे म्हणून ओळखले जातात. जसे की वांद्रे, चेंबूर आणि घाटकोपर, या ठिकाणी कधी तरी जमीन एका चहाच्या कपाच्या किमतीपेक्षाही स्वस्त होती. 1925 साली या भागातील जमिनी फक्त 3 रुपये ते 6.80 रुपये प्रति चौरस यार्ड (सुमारे 9 चौ. फूट) या दरात मिळत होत्या. (यार्ड हे लांबी मोजण्याचे एकक आहे. एक यार्ड म्हणजे ३ फूट किंवा ३६ इंच होय. एका करारानंतर १९५९ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर यार्डाला ०.९१४४ मीटर प्रमाणित करण्यात आले.)
advertisement
4/9
100 वर्षांत जमीन 19,000 पट महागली: फायनान्शियल एक्स्पर्ट ऋषभ जवेरी यांच्या अभ्यासानुसार, आज घाटकोपर पश्चिम भागातील जमिनीची किंमत 1,90,000 रुपये प्रति वर्ग यार्ड झाली आहे. म्हणजेच, 1925 ते 2025 या 100 वर्षांत या भागातील जमीन 19,000 पट महागली आहे. तसेच, वांद्रे पश्चिममधील जमिनीचे दर प्रति वर्ग यार्ड 3,78,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ही वाढ अविश्वसनीय असून त्याकाळी ज्यांनी मुंबईत गुंतवणूक केली असेल, ते आज अब्जाधीश असतील.
advertisement
5/9
जर 1000 रुपये गुंतवले असते, तर आज किती मिळाले असते: जर 1925 साली तुमच्या आजोबा-पणजोबांनी 1000 रुपये खर्च करून घाटकोपरमध्ये जमीन खरेदी केली असती, तर आज ती जमीन तब्बल 1.90 कोटी रुपयांची असती. याचप्रमाणे जर त्यांनी फक्त 100 रुपये गुंतवले असते, तरीही त्याचे मूल्य आज 19 लाख रुपये झाले असते.
advertisement
6/9
पूर्वी स्वस्त, आज लाखोंच्या घरात: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि गेल्या शतकभरात शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. पूर्वी मुंबईची लोकसंख्या कमी होती, त्यामुळे वांद्रे, चेंबूर आणि घाटकोपर हे भाग शहराच्या बाहेरचे मानले जायचे. त्यामुळे 1925 साली येथे जमीन विकत घेणे सहज शक्य होते. त्या काळात जमिनीच्या जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये छापल्या जायच्या, जिथे घाटकोपरमध्ये 3 रुपयांत मिळवा एक यार्ड जमीन! अशा ऑफर्स दिल्या जात होत्या.
advertisement
7/9
100 वर्षांपूर्वी जमीन घेणारे आज कोट्यधीश: आज घाटकोपर,चेंबूर आणि वांद्रे हे भाग अतिशय महागडे आहेत. जर त्याकाळी तुमच्या पूर्वजांनी येथे जमीन घेतली असती, तर आज तुम्ही मुंबईत श्रीमंतांच्या यादीत सामील असता.
advertisement
8/9
जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर जमिनीत किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे हा दीर्घकालीन फायदा देणारा निर्णय ठरू शकतो. कदाचित आज जी जमीन स्वस्त वाटते, ती 50-100 वर्षांनंतर कोट्यवधींची होऊ शकते. त्यामुळे पुढच्या वेळी 10 रुपयांनी काही होत नाही, असे म्हणण्याआधी विचार करा – हाच पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर भविष्यात किती मोठा परतावा मिळू शकतो.
advertisement
9/9
योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात प्रचंड फायदेशीर ठरू शकते. त्यातही जमिनीत गुंतवणूक लाभदायक ठरते. जमिनीच्या किंमती दीर्घकाळात कधीही कमी होत नाहीत, उलट वाढतच जातात. मुंबईत आज मालमत्ता घेणे अनेकांसाठी स्वप्नवत झाले आहे, मात्र पूर्वी लोकांसमोर अशी संधी होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Mumbai Land Price : पणजोबांनी फक्त 10 रुपये खरेदी केली असती तर आज तुम्ही कोट्यधीश असता