GK : दुबई विसरुन जा, भारताच्या 'या' शेजारील देशात ही मिळतं स्वस्त सोनं, तुम्हाला माहितीय का नाव?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हल्ली भारतात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि सोनं हे लोकांच्या आवाकाबाहेर गेलं आहे. त्यामुळे लोक आता वेगवेगळ्या देशातून सोनं आणू शकतो का? अशा विचारात आहेत.
advertisement
1/10

सोने (Gold) हे केवळ एक मौल्यवान धातू नसून ते संपत्ती, सौंदर्य आणि गुंतवणुकीचे प्रतीक देखील मानले जाते. त्याकडे स्त्रीधन म्हणून ही पाहिलं जातं तर काही लोक त्याकडे सेफ्टी म्हणून देखील पाहातात. प्रत्येक भारतीय घरात सोनं हे असतंच. भारतात तर सोन्याशिवाय लग्नच होत नाहीत.
advertisement
2/10
पण हल्ली भारतात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि सोनं हे लोकांच्या आवाकाबाहेर गेलं आहे. त्यामुळे लोक आता वेगवेगळ्या देशातून सोनं आणू शकतो का? अशा विचारात आहेत.
advertisement
3/10
कमी किंमतीत सोनं आणायचं झालं तर लोकांना सर्वात आधी आठवतो तो दुबई. पण तुम्हाला माहितीय का की भारताच्या शेजारी असा एक देश आहे जिथे सोनं खूप स्वस्त आहे?
advertisement
4/10
आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल आणि हा देश कोणता असा प्रश्न पडेल. चला त्याबद्दल सविस्तर समजून घेऊ.
advertisement
5/10
संपूर्ण जगात, भारताचा पूर्वेकडील शेजारी देश भूतान येथे सोनं सर्वात स्वस्त दरात मिळतं. भूतानमध्ये सोन्याची किंमत कमी असण्यामागे काही विशिष्ट कारणे आहेत, ज्यामुळे ते एक अद्वितीय बाजारपेठ म्हणून ओळखले जाते:
advertisement
6/10
कमी कर आणि शुल्क (Low Tax and Duty): भूतान सरकारने सोन्याच्या आयातीवर (Import) अतिशय कमी आयात शुल्क (Import Duty) लावले आहे. याशिवाय, सोन्याच्या विक्रीवर भूतानमध्ये कोणताही कर (Tax) लागत नाही.
advertisement
7/10
भूतान सरकारचा उद्देश आहे की पर्यटकांना आकर्षक किमतीत सोनं उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून देशाला भेट देणाऱ्या पर्यटनाला चालना मिळेल.
advertisement
8/10
पर्यटन प्रोत्साहन (Tourism Promotion): भूतानला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना शुल्क-मुक्त (Duty-Free) सोन्याची खरेदी करण्याची परवानगी आहे. हा विशेष नियम भूतान सरकारने देशात पर्यटन वाढवण्यासाठी केलेली एक योजना आहे.
advertisement
9/10
सोन्याची शुद्धता (Purity) किंमत कमी असली तरी याचा अर्थ असा नाही की सोन्याची शुद्धता कमी आहे. भूतानमध्ये विकले जाणारे सोने देखील आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उच्च प्रतीचे असते.
advertisement
10/10
अनेकदा, करांमध्ये झालेले तात्पुरते बदल किंवा चलनाच्या विनिमय दरातील (Currency Exchange Rates) चढ-उतार यामुळे दुबई, हाँगकाँग किंवा स्वित्झर्लंडसारखे देशही तात्पुरत्या कालावधीसाठी स्वस्त सोन्यासाठी ओळखले जातात, परंतु भूतानचे कमी-शुल्क (low-duty) मॉडेल हे एक स्थिर कारण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
GK : दुबई विसरुन जा, भारताच्या 'या' शेजारील देशात ही मिळतं स्वस्त सोनं, तुम्हाला माहितीय का नाव?