TRENDING:

Petrol Scam : पेट्रोल भरताना फक्त ‘झिरो’ पाहता? मग इथेच मोठी चूक करता, ‘5-3-2' थेअरी’ नेहमी लक्षात ठेवा

Last Updated:
अनेकदा आपण पंपावर जाऊन कर्मचाऱ्याकडे म्हणतो, “मीटर झिरो आहे का?” आणि मीटर शून्यावरून सुरू असल्याचे पाहून सुरक्षित असल्याचे समजतो. पण हे एवढं पुरेसं नाही.
advertisement
1/8
पेट्रोल भरताना फक्त ‘झिरो’ पाहता? इथेच मोठी चूक करता, ‘5-3-2' थेअरी’ लक्षात ठेवा
आजकाल बहुतेक लोक दररोज ऑफिस किंवा कामासाठी निघण्यापूर्वी आपली गाडी पेट्रोल/डिझेलने भरतात. काही लोक सकाळी, तर काही दुपारी पंपावर जातात आणि इंधन भरवतात. हा छोटा, रोजचा व्यवहार आपल्याला नेहमीच सोपा वाटतो, पण पेट्रोल पंपांवर काही वेळा ग्राहकांना फसवले जाण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत.
advertisement
2/8
अनेकदा आपण पंपावर जाऊन कर्मचाऱ्याकडे म्हणतो, “मीटर झिरो आहे का?” आणि मीटर शून्यावरून सुरू असल्याचे पाहून सुरक्षित असल्याचे समजतो. पण हे एवढं पुरेसं नाही.
advertisement
3/8
फसवणूक करणारे काही पंप कर्मचारी अत्यंत शिताफीने काम करतात. उदाहरणार्थ, मीटर झिरोवरून सुरू झाल्यावर काही वेळा तो थेट 5–6 रुपयांवर थांबतो आणि नंतर पेट्रोल भरणं सुरू केलं जातं. हे इतक्या क्षणात होते की जर तुम्ही लक्ष न दिले तर सहज फसवणूक होते.
advertisement
4/8
सगळ्यात सामान्य फसवणुकीचं उदाहरण म्हणजे ग्राहक म्हणतात, “₹100, ₹200, ₹500 चं पेट्रोल भरा.” अनेक पंपांवर ‘प्रीसेट’ ट्रिक वापरली जाते, म्हणजे मशीनमध्ये आधीच रक्कम टाकलेली असते आणि ग्राहकाला नक्की किती लिटर पेट्रोल मिळाले हे कळत नाही.
advertisement
5/8
फसवणुकीपासून वाचण्यासाठी ‘2-3-5 थेअरी’ लक्षात ठेवा.
advertisement
6/8
पेट्रोल पंपावर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे लिटरमध्ये पेट्रोल भरवणं.“2 लिटर द्या”“3 लिटर द्या”“5 लिटर द्या”यामुळे तुम्हाला पेट्रोल किती दिलं जातं हे नेमकं दिसतं आणि प्रीसेट फसवणुकीपासून वाचता येतं.
advertisement
7/8
आणखी काही टिप्सनेहमी विश्वासार्ह आणि चाचणी घेतलेला पेट्रोल पंप निवडा.शक्य असल्यास डिजिटल रिसीट मागा.जर फसवणूक झाली, तर लगेच पंप मॅनेजर किंवा कंपनीच्या हेल्पलाईनवर तक्रार करा.
advertisement
8/8
टोल फ्री क्रमांक:Indian Oil: 1800 2333 555HP: 1800 2333 555BPCL: 1800 22 4344
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Petrol Scam : पेट्रोल भरताना फक्त ‘झिरो’ पाहता? मग इथेच मोठी चूक करता, ‘5-3-2' थेअरी’ नेहमी लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल