Silver Price Today: पुन्हा म्हणून नका सांगितलं नाही, 10,000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, 200000 वर जाणार दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिवाळीआधी चांदीचे दर 1 लाख 92 हजारांवरून 1 लाख 82 हजारांवर आले. भारतात चांदीची मागणी वाढली असून पुरवठ्यात अडथळा आहे. अजय केडिया व अनुज गुप्ता यांनी गुंतवणुकीचा सल्ला दिला.
advertisement
1/7

धनत्रयोदशीआधी चांदीचे दर पुन्हा घसरले आहेत. मार्केटमध्ये चांदी 1 लाख 92 हजार रुपयांच्या आसपास पोहोचली होती. तेच आता मार्केटमध्ये उलटफेर झालं आहे. दिवाळीआधी चांदीचे दर 10 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. 1 लाख 82 हजार रुपयांवर आलले आहेत.
advertisement
2/7
दिवसेंदिवस वाढणाऱ्या चांदीची मागणी, सणवाराला आणि लग्नसराई निमित्ताने चांदीची होणारी खरेदी यामुळे चांदीचा मोठा तुटवडा मार्केटमध्ये होत आहे. धनत्रयोदशीला चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं त्यामुळे चांदीचे दर आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्वस्तात चांदी खरेदी करायची असेल तर लगेच करुन घ्या नाहीतर नुकसान होईल.
advertisement
3/7
भारत हा जगातील चांदीच्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशी यांसारख्या सणांदरम्यान सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, ज्यामुळे चांदीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
advertisement
4/7
औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर झपाट्याने वाढत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चांदीचा सर्वाधिक वापर होतो. याव्यतिरिक्त, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) उद्योगातही चांदीचा वापर वेगाने वाढला आहे.
advertisement
5/7
एका बाजूला मागणी वाढत असताना, चांदीच्या पुरवठ्यात मात्र मोठा अडथळा निर्माण झाला आहे. काही देशांमध्ये पर्यावरणाचे नियम किंवा खाणी बंद झाल्यामुळे चांदीचे उत्खनन कमी झाले आहे. विशेष म्हणजे, सुमारे ७० टक्के चांदी ही तांबे आणि जस्त यांसारख्या दुसऱ्या धातूंच्या उत्खननादरम्यान 'बाय-प्रॉडक्ट' म्हणून मिळते. तांब्याचे उत्खनन वाढल्याशिवाय चांदीचा पुरवठा वाढू शकत नाही, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील मोठ्या तफावतीमुळे चांदीची कमतरता निर्माण झाली आहे.
advertisement
6/7
भास्करने दिलेल्या वृत्तानुसार अजय केडिया, डायरेक्टर केडिया कमोडिटीच्या मते, चांदीने आधीच १००% नफा दाखवला आहे, त्यामुळे सध्या आक्रमक खरेदी योग्य नाही. मात्र, दीर्घकाळात सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये जास्त तेजी दिसेल. त्यांनी २०२४ च्या अखेरीस आणि २०२५ च्या पहिल्या सहामाहीत गुंतवणुकीसाठी चांदीला पहिली पसंती दिली होती.
advertisement
7/7
अनुज गुप्ता, हेड (कमोडिटी अँड करन्सी, HDFC सिक्योरिटीज): त्यांचे मत आहे की, सध्या चांदी सोन्यापेक्षा अधिक आकर्षक मूल्यावर आहे. त्यांच्या मते, चीनमध्ये व्याज दर कमी झाल्यामुळे तेथील कारखाने वेगाने चालत आहेत आणि याच औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या दरात वाढ होत आहे. ते म्हणतात की चढ-उतारांसह ही तेजी कायम राहील, त्यामुळे दरात थोडी घसरण झाल्यास खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Silver Price Today: पुन्हा म्हणून नका सांगितलं नाही, 10,000 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, 200000 वर जाणार दर