TRENDING:

चांदीतली गुंतवणूक धोक्यात, सोनं रॉकेटच्या स्पीडनं सुस्साट, धनत्रयोदशीआधी मार्केटमध्ये भूकंप

Last Updated:
चांदीचे दर अचानक 5000 रुपयांनी घसरले असून मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. सोन्याचे दरही वाढले असून इंडियन बुलियन असोसिएशनने किंमत घट दर्शवली आहे.
advertisement
1/7
चांदीतली गुंतवणूक धोक्यात, सोनं रॉकेटच्या स्पीडनं सुस्साट, धनत्रयोदशीआधी भूकंप
सोन्याचे दर</a> मात्र सुस्साट सुटले आहेत. " width="1600" height="900" /> चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ज्या स्पीडने चांदीवर चढली तेवढ्याच स्पीडने पुन्हा दर आपटले आहेत. चांदीचा तुटवडा असला तरीसुद्धा दरवाढ होत असताना अचानक दर आपटल्याने मार्केटमध्ये खळबळ उडाली. इतकंच नाही तर सोन्याचे दर मात्र सुस्साट सुटले आहेत.
advertisement
2/7
धनत्रयोदशीआधी चांदीचे दर आपटले तर सोन्याचे वेगाने पळत आहेत. त्यामुळे सोनं चांदी खरेदी करणं आवाक्याबाहेर जाणार आहे. रिटेल मार्केटमध्ये चांदीचे दर 1 लाख 78 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर GST सह 1 लाख 76 हजारवर प्रति किलो चांदीचे दर पोहोचले आहेत.
advertisement
3/7
सोन्याच्या दरांचा विचार करायचा झाला तर चांदीचे दर रिटेल मार्केटमध्ये १ लाख 35 हजार रुपये प्रति तोळा आहे. एक ग्रॅम सोन्यासाठी 13 हजार 277 रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट सोन्यासाठी १२ हजार १७० रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट 8 ग्रॅम सोन्यासाठी 97 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
advertisement
4/7
इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते, सोन्याच्या दरात आज किंचित अशी घट पाहायला मिळाली आहे. 999 शुद्ध सोन्याचे दर 1500 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर GST सह दर 500 रुपयांनी वधारले आहेत. GST सह एक तोळे सोन्याचे दर 1 लाख 34 हजार रुपये आहेत. तर GST वगळता 1 लाख 33 हजार रुपये प्रति तोळा दर पोहोचले आहेत.
advertisement
5/7
23 कॅरेटसाठी ग्राहकांना 1 लाख 26 हजार रुपये प्रति तोळा मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेटसाठी 1 लाख 21 हजार रुपये प्रति तोळा दर आहेत. 20 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये दर असणार आहेत. तर 14 कॅरेट सोनंही आता परवडणार नाही. कारण त्याचे दरही 77 हजार रुपये प्रति तोळा पोहोचले आहेत.
advertisement
6/7
इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते चांदीचे दरही आता आज 5000 रुपयांनी घसरले आहेत. 1 लाख 75 हजार रुपयांच्या आसपास दर आहेत. आता सोन्याचे वळ, साखळ्या गेला बाजार तर जोडवी घेणंही महाग होत आहे. त्यामुळे चांदीचे दागिने देखील परवडणार नाहीत.
advertisement
7/7
चांदीमध्ये गुंतवणूक केलेल्यांना चांदीचे दर झपाट्याने वाढल्यामुळे चांगले रिटर्न्स मिळाले. मात्र मागच्या 24 तासात मोठा तोटा झाला. तर येत्या काळात चांदीचे दर 2 लाखांवर तर सोन्याचे दर एक लाख 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
चांदीतली गुंतवणूक धोक्यात, सोनं रॉकेटच्या स्पीडनं सुस्साट, धनत्रयोदशीआधी मार्केटमध्ये भूकंप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल