Women Success Story: व्यवसायासाठी धाडसं दाखवलं, एका निर्णयाने बदल आयुष्य, स्वप्ना यांची कहाणी
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
आईच्या व्यवसायाला बंद पडू न देता त्यांनी तो नव्या उंचीवर नेला आहे. व्यवसाय बंद होऊ नये, हीच प्रेरणा होती, असे त्या अभिमानाने सांगतात.
advertisement
1/7

अनेक जण व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. बोरिवलीतील स्वप्ना त्रिमुखे यांनी आपल्या आईने सुरू केलेला साड्यांचा व्यवसाय पुढे नेण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो आज यशस्वीपणे नऊ वर्षांपासून करत आहेत. आईच्या व्यवसायाला बंद पडू न देता त्यांनी तो नव्या उंचीवर नेला आहे. व्यवसाय बंद होऊ नये, हीच प्रेरणा होती, असे त्या अभिमानाने सांगतात.
advertisement
2/7
स्वप्ना यांना मूळतः गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं होतं, पण काही कारणास्तव त्या मार्गाने जाता आलं नाही. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्या अनुभवातून प्रेरणा घेत व्यवसायात उडी घेतली आणि आज त्या महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात.
advertisement
3/7
त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या राज्यांतून, विशेषतः तामिळनाडू आणि कोलकातामधून पारंपरिक आणि दर्जेदार साड्यांचा संग्रह करून विक्री सुरू केली आहे. त्या स्वतः त्या भागात जाऊन साड्या निवडतात, त्यामुळे त्यांच्याकडे असलेली उत्पादने दर्जेदार असून ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे.
advertisement
4/7
स्वप्ना सांगतात की, व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधीही हार मानली नाही. या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीचा, सासू-सासऱ्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा मोठा पाठिंबा मिळाला.
advertisement
5/7
हे सगळे कायम त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्ना आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकल्या. खचून न जाता, प्रयत्न करत राहिले म्हणूनच माझा ब्रँड उभा राहिला, असे त्या अभिमानाने सांगतात.
advertisement
6/7
स्वप्ना त्रिमुखे यांचे यश हे अनेक महिलांसाठी प्रेरणादायक आहे. त्या म्हणतात, स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. स्वावलंबी बनल्यास कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही.
advertisement
7/7
त्यांच्या यशकथेवरून हेच शिकायला मिळतं की, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबा यांच्या जोरावर कोणतीही स्त्री आपलं स्वप्न पूर्ण करू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Women Success Story: व्यवसायासाठी धाडसं दाखवलं, एका निर्णयाने बदल आयुष्य, स्वप्ना यांची कहाणी