TRENDING:

Success Story: व्यवसायासाठी नोकरी सोडण्याचे धाडस दाखवलं, आता महिन्याला 4 लाख कमाई

Last Updated:
इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मिळालेली आकर्षक पगाराची नोकरी त्यांनी सोडली आणि स्वतःच्या आवडीवर आधारित प्राणिश फ्रेग्रन्सेस या नावाने अत्तर आणि फ्रेगरन्स व्यवसायाची स्थापना केली. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
1/7
व्यवसायासाठी नोकरी सोडण्याचे धाडस दाखवलं, आता महिन्याला 4 लाख कमाई
आजच्या स्पर्धात्मक युगात जिथे तरुण पिढीला उच्च शिक्षणानंतर चांगल्या पगाराच्या नोकरीची स्वप्ने पडतात, तिथे पुण्यातील उदय आगाशे यांनी अगदी वेगळा आणि धाडसी निर्णय घेतला.
advertisement
2/7
इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मिळालेली आकर्षक पगाराची नोकरी त्यांनी सोडली आणि स्वतःच्या आवडीवर आधारित प्राणिश फ्रेग्रन्सेस या नावाने अत्तर आणि फ्रेगरन्स व्यवसायाची स्थापना केली. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
3/7
सुगंधांविषयी असलेली ओढ आणि नव्या कल्पना राबवण्याची वृत्ती यामुळे उदय आगाशे यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, आर्थिक चढउतार, बाजारपेठेतील स्पर्धा अशा अडथळ्यांचा सामना करत त्यांनी आपला ब्रँड उभा केला. मात्र त्यांची चिकाटी, नव्या सुगंधांचा सातत्याने शोध घेण्याची वृत्ती आणि गुणवत्तेला दिलेले प्राधान्य यामुळे प्राणिश फ्रेग्रन्सेस हळूहळू ग्राहकांच्या पसंतीस उतरले.
advertisement
4/7
आज या ब्रँड अंतर्गत विविध प्रकारचे परफ्यूम, अत्तर, रूम फ्रेशनर आणि वैयक्तिक वापरातील सुगंधी उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. पुण्यातून सुरू झालेला हा सुगंधी प्रवास आता महाराष्ट्राच्या पलीकडेही पोहोचला आहे.
advertisement
5/7
त्यांच्या याच फ्रेगरन्स व्यवसायातून उदय आगाशे हे महिन्याला तब्बल चार लाख रुपये कमवतात. तर त्यांचे वार्षिक उत्पन्न हे जवळपास 50 लाखांच्या घरात आहे.
advertisement
6/7
देशांतर्गत बाजारपेठेत प्राणिश फ्रेग्रन्सेसला मागणी वाढू लागली आहे. उदय आगाशे यांचा हा प्रवास केवळ व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कारण नोकरीच्या सुरक्षिततेपेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करूनही मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
advertisement
7/7
उदय आगाशे हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेगरन्स ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून देतात. 200 रुपयांपासून ते 3000 हजारपर्यंतचे अनेक विविध प्रकारचे फ्रेगरन्स, अत्तर त्यांच्याकडे मिळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story: व्यवसायासाठी नोकरी सोडण्याचे धाडस दाखवलं, आता महिन्याला 4 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल