क्रेडिट कार्ड कायमचे बंद होणार, कर्जाची झंझट नाही; डिजिटल पेमेंट्समध्ये खळबळ, QR Code स्कॅन करताच होणार चमत्कार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
UPI Payments Converted Into EMI: लवकरच UPI पेमेंट्सना QR कोड स्कॅन करून थेट EMI मध्ये रूपांतर करता येणार आहे. NPCI च्या या उपक्रमामुळे मोठ्या खरेदी आणखी सोपी होणार असून, UPI ‘पेमेंट + क्रेडिट’ प्लॅटफॉर्ममध्ये बदलणार आहे.
advertisement
1/11

आता तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI पेमेंटचे थेट EMI (मासिक हप्त्यांमध्ये) मध्ये रूपांतर करू शकाल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असेल; तुम्हाला फक्त काही स्टेप फॉलो करायच्या आहेत. तुमचा सोयीस्कर हप्त्यांचा प्लॅन निवडायचा आहे आणि तुमचे पेमेंट त्वरित पूर्ण करायचे आहे.
advertisement
2/11
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सध्या डिजिटल पेमेंटच्या पुढील मोठ्या टप्प्यासाठी तयारी करत आहे. UPI वर RuPay क्रेडिट कार्ड्स आणि क्रेडिट लाईन्स यशस्वीरित्या जोडल्यानंतर, आता NPCI चे मुख्य लक्ष युजर्सना UPI व्यवहारांना EMI मध्ये बदलण्याची सुविधा देण्यासाठी आहे.
advertisement
3/11
या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे क्रेडिटची उपलब्धता वाढेल, ग्राहकांना जास्त किमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि भारतातील सर्वात विश्वासार्ह पेमेंट प्रणाली म्हणून UPI चे स्थान आणखी मजबूत होईल.
advertisement
4/11
UPI वर क्रेडिट क्रांती: EMI सुविधा का महत्त्वाची? NPCI आता फिनटेक कंपन्यांना UPI वर EMI फिचर आणण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे ग्राहक त्यांचे पेमेंट त्वरित मासिक हप्त्यांमध्ये रूपांतरित करू शकतील. ही सेवा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि यामुळे UPI प्लॅटफॉर्मवरील क्रेडिट व्यवहारांना मोठी चालना मिळेल.
advertisement
5/11
हे नवीन मॉडेल कार्ड-आधारित PoS (पॉईंट ऑफ सेल) पेमेंटप्रमाणेच काम करेल. जिथे ग्राहक शॉपिंग करतानाच त्यांचे स्वाईप किंवा व्यवहार थेट EMI मध्ये रूपांतरित करू शकत होते. UPI वर RuPay क्रेडिट कार्ड्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच NPCI ही सुविधा आणत आहे.
advertisement
6/11
यासोबतच NPCI ने आता क्रेडिट लाईन्सचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. ज्यामुळे UPI ची व्याप्ती केवळ साध्या पेमेंटपुरती मर्यादित न राहता क्रेडिट इकोसिस्टमपर्यंत विस्तारली आहे.
advertisement
7/11
अनेक प्रमुख बँका या क्रेडिट सुविधा युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी Navi आणि Paytm सारख्या फिनटेक कंपन्यांसोबत भागीदारी करत आहेत. या नवीन सुविधेमुळे NPCI साठी महसुलाचा एक नवीन स्रोतही तयार होण्याची शक्यता आहे. एका गुरुग्राम-आधारित फिनटेक संस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, NPCI क्रेडिट लाईन्सद्वारे UPI वर सुमारे १.५% इंटरचेंज शुल्क आकारण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे एक स्पष्ट महसूल प्रवाह सुरू होईल.
advertisement
8/11
Navi चे CEO राजीव नरेश यांनी स्पष्ट केले की, EMI चा पर्याय अद्याप सक्रिय नाही. परंतु पुढील रोलआउटमध्ये ग्राहक आवश्यक अटी पूर्ण केल्यास, QR कोड स्कॅन करताना पेमेंटचे EMI मध्ये रूपांतर करू शकतील.
advertisement
9/11
UPI व्यवहारांच्या मर्यादांमध्ये मोठी वाढ याशिवाय याच महिन्यापासून UPI व्यवहारांच्या मर्यादांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे. गुंतवणूक आणि विमा क्षेत्रासाठी प्रति व्यवहार मर्यादा 2 लाख वरून 5 लाख करण्यात आली आहे, तर दैनंदिन मर्यादा 10 लाख निश्चित करण्यात आली आहे. सरकारी ई-मार्केटप्लेस आणि कर पेमेंटसाठी ही मर्यादा 1 लाख वरून वाढवून 5 लाख करण्यात आली आहे.
advertisement
10/11
प्रवास बुकिंगसाठी प्रति व्यवहार मर्यादा 5 लाख (आणि दैनंदिन 10 लाख) करण्यात आली आहे, तसेच क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसाठी 5 लाखांपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे (दैनंदिन 6 लाख मर्यादा).
advertisement
11/11
कर्ज आणि EMI संकलनासाठी, मर्यादा प्रति व्यवहार 5 लाख आणि प्रति दिन कमाल 10 लाख केली गेली आहे. दागिने खरेदीसाठी पूर्वीची 1 लाखाची मर्यादा दुप्पट करून 2 लाख प्रति व्यवहार करण्यात आली आहे (दैनंदिन 6 लाख मर्यादा), आणि मुदत ठेव (Term Deposits) साठी प्रति व्यवहार मर्यादा 2 लाख वरून 5 लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
क्रेडिट कार्ड कायमचे बंद होणार, कर्जाची झंझट नाही; डिजिटल पेमेंट्समध्ये खळबळ, QR Code स्कॅन करताच होणार चमत्कार