ही गाय बनवणार मालामाल, महिन्याची कमाई होईल इतकी की नोकरीला कराल बाय!, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिंदू संस्कृतीत गायीला अत्यंत महत्त्व आहे. तर अनेक जण शेती करत असताना गोपालन करतात. तसेच या गोपालनातून अनेक जण चांगली कमाई करत आहे. नेमकी कोणती गायीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करू शकतात, तेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
1/7

गुजरात राज्यातील अमरेली येथील पशुपालक गिर जातीच्या गायी पाळून या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. यामध्ये एक गाय प्रतिदिवस 14 लीटर दूध देते. अशाप्रकारे प्रत्येक महिन्याची कमाई ही 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत पोहोचते.
advertisement
2/7
अमरेली येथील पशुपालक या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. डामगनर येथील प्रदीपभाई एक पशुपालक आहेत आणि गायींचा व्यापार करतात. ते आसाम, हरियाणा, पंजाब, बंगळुरू आणि महाराष्ट्रात गायी विकतात.
advertisement
3/7
प्रदीपभाई दर महिन्याला 20 पेक्षा जास्त गायी विकतात आणि त्यातून चांगली कमाई करतात. यामध्ये उच्च जातीच्या गिर गायी ग्रामीण भागातून आणल्या जातात. त्यांच्या प्रजननानंतर चांगल्या जातीच्या गायी तयार करून विक्रीसाठी तयार केल्या जातात.
advertisement
4/7
अमरेली जिल्ह्यातील तरुणही पशुपालनाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ते उच्च जातीच्या गिर गायी आणि म्हशी पाळतात आणि त्यापासून दूध उत्पादन करतात. एका गिर गायीची किंमत सौराष्ट्रमध्ये लाखो रुपये आहे. तर एक लीटर दूध याठिकाणी 70 ते 100 रुपयांत विकले जाते.
advertisement
5/7
अशाप्रकारे एका गिर गायीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. अमरेलीमध्ये विविध प्रकारच्या गायी आढळतात. यामध्ये गिर जातीची गाय ही विशेष मानली जाते. तर याशिवाय कपिला गायही विशेष मानली जाते.
advertisement
6/7
डामनगर गावातील एका पशु पालकाजवळ गिर गाय आहे. या गायीची किंमत ही 1 लाख 35 हजार रुपये आहे. तसेच ही गाय प्रतिदिवस 14 लीटर दूध देते. या गाईच्या दुधापासून तूपही बनवले जाते. तसेच या गायीच्या दुधापासून तूपही बनवले जाते.
advertisement
7/7
गिर जातीच्या गायीच्या माध्यमातून याठिकाणी अनेक जण चांगले उत्पन्न घेत आहेत. तुम्हालाही एखादा व्यवसाय करायचा असेल तर या गिर जातीच्या गायीच्या माध्यमातून तुम्ही चांगले उत्पन्न कमाऊ शकतात. (सूचना - ही माहिती स्थानिकांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
ही गाय बनवणार मालामाल, महिन्याची कमाई होईल इतकी की नोकरीला कराल बाय!, photos