मुंबईकरांचा मोठा खोळंबा संपणार! तब्बल १० महिन्यांनंतर 'या' तारखेला पुन्हा मोनोरेल धावणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल सेवा मे २०२६ पासून सुरू होणार असून एमएमआरडीएने १० नवीन अत्याधुनिक गाड्या ताफ्यात सामील केल्या आहेत. ISA सुरक्षा तपासणी सुरू आहे.
advertisement
1/8

मागच्या काही दिवसांपासून मोनो रेल बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. रविवारी जेव्हा मेगाब्लॉक असतो तेव्हा मोनो रेलनं प्रवास अगदी सोपा होत होता. मात्र मोनो रेल बंद झाल्यापासून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
advertisement
2/8
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था शोधणाऱ्या मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून बंद असलेली चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल सेवा सुरू होणार आहे. याची तारीख जरी समोर आली नसली तरी मे महिन्यापासून सुरूवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
3/8
काही तांत्रिक कारणामुळे आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून रखडलेली ही सेवा मे २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली. पावसाळ्यात सलग दोनदा झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरडीएने खबरदारी म्हणून मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती.
advertisement
4/8
आता या सेवेला आधुनिक रूप देण्यात आले असून, पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात ही सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जेव्हा कुर्ला-सायन ट्रेन बंद असतात तेव्हा प्रवाशांना मोनोरेलचा मोठा आधार असतो. त्यामुळे ही सेवा लवकर सुरू व्हावी यासाठी प्रवासी देखील प्रार्थना करत आहेत.
advertisement
5/8
मोनोरेलच्या जुन्या गाड्यांची दुरवस्था आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. याची दखल घेत प्रशासनाने आता मोनोरेलच्या ताफ्यात १० नवीन अत्याधुनिक रेल्वे सामील केल्या आहेत. या नवीन गाड्यांची चाचणी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, सध्या ISA सुरक्षा तपासणी सुरू आहे.
advertisement
6/8
ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच प्रवाशांना प्रवेश दिला जाईल. एमएमआरडीए केवळ जुनी सेवा सुरू करून थांबणार नाही, तर मुंबईत मोनोरेलचे जाळे विस्तारण्याचाही त्यांचा मानस आहे.
advertisement
7/8
अंधेरी पश्चिम ते मंडाले या मार्गावरही नवीन मोनोरेल सेवा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. नव्या मोनोरेल गाड्या मेट्रोप्रमाणेच आरामदायी आणि हाय-टेक असतील. मोनोरेलच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी निवृत्त मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून तपासणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
8/8
चेंबूर ते जेकब सर्कल या दरम्यान प्रवास करण्यासाठी रस्ते मार्गावरून तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. मोनोरेल सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सुरक्षित प्रवास मिळेल. याशिवाय, चेंबूर आणि मंडाले परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईकरांचा मोठा खोळंबा संपणार! तब्बल १० महिन्यांनंतर 'या' तारखेला पुन्हा मोनोरेल धावणार