Panvel Rain : गाड्या अन् रस्ते गेले पाण्याखाली; घराबाहेरही पडता येईना, पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा कहर, PHOTOS
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पनवेल : नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
1/7

आदई आणि सुकापूर भागातील गावांमध्ये पाणी भरू लागलं असून रस्ते आणि सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. स्थानिक प्रशासनाने पाणी काढण्याचं काम तत्काळ सुरू केलं आहे.
advertisement
2/7
नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपत्कालीन सेवा विभाग आणि महानगरपालिका सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.आदई आणि सुकापूर या भागांमध्ये गावांत पाणी भरल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
advertisement
3/7
रस्ते आणि सोसायट्यांमध्येही गुडघाभर पाणी साचलं आहे. या पाण्यामुळे रहदारीत अडथळे निर्माण झाले आहेत.नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
4/7
संपूर्ण पनवेल परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून रात्रभर पाऊस पडल्याने अनेक सोसायट्यात पाणी शिरलं आहे. यामुळे पार्किंगला लावलेल्या अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याचं चित्र असून आलं.
advertisement
5/7
अनेक रहिवाशी बाहेर पडताना पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाचा त्रास नागरिकांना झाला असून अग्निशमन दल आणि महापालिका याकडे लक्ष ठेऊन आहे.
advertisement
6/7
अनेकजण घरातून बाहेर पडू शकले नाहीत. संपूर्ण पनवेल परिसराला पावसाने अक्षरशः झोडपलं असल्याचं चित्र असून पुढील काही तासही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..
advertisement
7/7
मुसळधार पावसामुळे पनवेल मधील गाढी, काळूंद्रे, कासाडी नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून धोक्याची पातळी वाढली ओलांडली नसली तरी, आसपास राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Panvel Rain : गाड्या अन् रस्ते गेले पाण्याखाली; घराबाहेरही पडता येईना, पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा कहर, PHOTOS