रणवीर, अक्षय खन्नाच्या Dhurandhar चं बॉक्स ऑफिवर वादळ, सात दिवसांत किती केली कमाई?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dhurandhar Box Office Collection Day 7 Ranveer Singh Akshaye Khanna Spy Thriller Film Enters Rs 200 Crore in India
advertisement
1/7

रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजच्या सात दिवसांतच या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. 'धुरंधर' ही 2025 मधील हायएस्ट ग्रॉसिंग फिल्म ठरली आहे. जगभरातील सिनेप्रेक्षकांचा या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
2/7
'धुरंधर' ही एक स्पाय थ्रिलर फिल्म आहे. पाकिस्तानमध्ये घडणारं या चित्रपटाचं कथानक आहे.यात रणवीर सिंहने एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. जो ल्यारीतील दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसखोरी करतो. हमजा अली मजारी हे रणवीरने साकारलेल्या पात्राचं नाव आहे.
advertisement
3/7
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, सौम्या टंडन आणि राकेश बेदी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'धुरंधर'च्या चित्रपटाच्या कथानकासह सर्व कलाकारांच्या दमदार अभिनयाचंही चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
advertisement
4/7
'धुरंधर' हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ओपनिंग डेला या चित्रपटाने 28 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 32 कोटी, तिसऱ्या दिवशी 43 कोटी, चौथ्या दिवशी 23.25 कोटी, पाचव्या दिवशी 27 कोटी, सहाव्या दिवशी 27 कोटी आणि सातव्या दिवशी 27 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या सात दिवसांत या चित्रपटाने 207.25 कोटींचा गल्ला जमवला आहे.
advertisement
5/7
'धुरंधर' या चित्रपटाने रिलीजच्या सात दिवसांतच बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकलं आहे. यात 'सिकंदर' (109.83 कोटी), 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (153.55 कोटी), 'रेड 2' 173.05 कोटी या चित्रपटांचा समावेश आहे.
advertisement
6/7
'धुरंधर' या चित्रपटातील रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या कामाचं सध्या जगभरात कौतुक होत आहे. रणवीरचं धमाकेदार ट्रान्सफॉर्मेशन आणि अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर अक्षय खन्नाने पावरफुस खलनायक साकारला आहे. रहमान डकैतच्या भूमिकेसाठी त्याने 100% दिले आहेत.
advertisement
7/7
'धुरंधर' हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. भू-राजकीय संघर्षा आणि 26/11 सारख्या दु:खद प्रसंगांवर आधारित आहे. आयबी प्रमुख (आर. माधवन) यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी दहशतवादाच्या जाळ्याचा नायनाट करण्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. दुसरीकडे देशभक्ती, विश्वासघात आणि नैतिक संघर्षही दाखवण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणवीर, अक्षय खन्नाच्या Dhurandhar चं बॉक्स ऑफिवर वादळ, सात दिवसांत किती केली कमाई?