TRENDING:

Jasprit Bumrah : आकाश चोप्रा खरं बोलत होता! बुमराहसोबत 2016 नंतर असं पहिल्यांदाच घडलं, साऊथ अफ्रिकेला नस सापडली

Last Updated:
Jasprit Bumrah Sixes hitting Record : टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आता आगामी भारतात होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने घाम गाळत आहे. अशातच आता बुमराहला मोठा धक्का बसलाय.
advertisement
1/5
Jasprit Bumrah : आकाश चोप्रा खरं बोलत होता! 2016 नंतर असं पहिल्यांदाच...
समालोचक आकाश चोप्रा याचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. बुमराहला टी-ट्वेंटीमध्ये सिक्स मारणं सोपं नाही. जर कुणी मारलं तर लोक डॉक्युमेंन्ट्री काढतात, असं आकाश चोप्रा म्हणाला होता.
advertisement
2/5
अशातच आकाश चोप्रा खरं बोलत होता, असं सिद्ध झालंय. जसप्रीत बुमराहला त्याच्या टी-ट्वेंटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एकाच कोणत्यातरी संघाने डावात चार सिक्स मारले आहेत. हा त्याचा 82 वा टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना होता.
advertisement
3/5
यापूर्वी, बुमराहने कधीही एकाच डावात तीनपेक्षा जास्त सिक्स मारले नव्हते. त्याची याआधीची सर्वात वाईट कामगिरी 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होती, जेव्हा त्याने तीन सिक्स खाल्ले होते.
advertisement
4/5
2016 मध्ये बुमराहने डेब्यू केला होता. त्यानंतर त्याने 80 टी-ट्वेंटी सामने खेळले अन् 101 विकेट्स नावावर केले. पण या 80 सामन्यात कधीही त्याला एकाच मॅचमध्ये चार सिक्स कुणीही मारले नाहीत.
advertisement
5/5
दरम्यान, साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात बुमराहने आपलं विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं. 100 विकेट्स पूर्ण करणारा बुमराह दुसरा भारतीय बॉलर ठरला होता. तर पहिल्या स्थानावर अर्शदीप सिंग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Jasprit Bumrah : आकाश चोप्रा खरं बोलत होता! बुमराहसोबत 2016 नंतर असं पहिल्यांदाच घडलं, साऊथ अफ्रिकेला नस सापडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल