TRENDING:

Ganesh Chaturthi 2024: मुंबईत सर्वात श्रीमंत आणि उंच गणपती कोणता? ही आहेत मुंबईतील टॉप 7 गणेश मंडळं, तुम्ही कधी भेट देताय?

Last Updated:
गणेशोस्तवात मुंबईचे एक वेगळेच रूप पाहायला मिळते. मुंबईच्या गल्ली-गल्लीत बाप्पाची स्थापना केली जाते. अशा परिस्थित मुंबईतील आवर्जून पाहण्यासारख्या मंडळांची यादी आपण आज पाहूया.
advertisement
1/7
मुंबईत सर्वात श्रीमंत आणि उंच गणपती कोणता? ही आहेत मुंबईतील टॉप 7 गणेश मंडळं
गणेशोस्तवात मुंबईचे एक वेगळेच रूप पाहायला मिळते. मुंबईच्या गल्ली-गल्लीत बाप्पाची स्थापना केली जाते. अशा परिस्थित मुंबईतील आवर्जून पाहण्यासारख्या मंडळांची यादी आपण आज पाहूया. या यादीत पहिले नाव येते ते लालबागचा राजाचे. नवसाला पावणारा बाप्पा अशी या गणपतीची ख्याती आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागतात.
advertisement
2/7
ग्रॅन्ट रोड येथील खेतवाडीचा गणराजही खूप प्रसिद्ध आहे. गेली कित्येक वर्ष या बाप्पाच्या मुर्तीची रचना बदलण्यात आली नाही. इतकंच नाही तर खेतवाडीचा गणराजाने आजवर अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.
advertisement
3/7
किंग्ज सर्कल येथील GSB सेवा मंडळ गणपतीही अतिशय खास आहे. दरवर्षी या गणपतीला सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि वस्तू चढवले जातात. 295 किलोग्रॅम चांदी, मौल्यवान वस्तू आणि महागणपतीला शोभणारे तब्बल 66 किलोग्रॅम सोन्याचे दागिने यांच्यासह हे मंडळ भव्यतेचे प्रतीक आहे.
advertisement
4/7
लालबागचा राजाच्या काही अंतरावरच गणेशगल्ली येथे मुंबईचा राजाची स्थापना केली जाते. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगारांनी या गणपतीची स्थापना केली. दरवर्षी देशभरातील परिस्थितीवर आधारित वेगवेगळे देखावे साकारून हे मंडळ भाविकांना थक्क करते.
advertisement
5/7
अंधेरीला स्थलांतरित झालेल्या कंपन्यांमधील ब्लू कॉलर कामगारांनी 1966 मध्ये अंधेरीचा राजाची स्थापना केली. मुंबईतील सर्वात लांब विसर्जन मिरवणुका आयोजित करण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे
advertisement
6/7
चिंतामणी या नावाने लोकप्रिय असलेला चिंचपोकळीचा राजा देखील मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ आहे. या बाप्पाच्या आगमनासाठी भाविक दूरवरून गर्दी करतात. आकर्षक देखावा आणि सामाजिक कार्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे.
advertisement
7/7
लोकमान्य टिळक यांनी स्थापना केलेला गिरगावचा राजा त्याच्या भल्यामोठ्या मातीच्या मुर्तीसाठी प्रसिद्ध आहे. या पर्यावरणपूरक बाप्पाला दरवर्षी पारंपारिक फेटा घालण्यात येतो. या मंडळाला ऐतिहासिक आणि पारंपारिक महत्त्व आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Ganesh Chaturthi 2024: मुंबईत सर्वात श्रीमंत आणि उंच गणपती कोणता? ही आहेत मुंबईतील टॉप 7 गणेश मंडळं, तुम्ही कधी भेट देताय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल