मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात हायअलर्ट, बेवारस बॅग सापडताच परिसर रिकामा; सर्व भाविकांना बाहेर काढलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मंदिराबाहेर काढण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
advertisement
1/7

मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर परिसरात संध्याकाळच्या सुमारास बेवारस बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मंदिराच्य परिसरात संशयास्पदरीत्या पडलेली बॅग काही भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मंदिर प्रशासनाला याची माहिती दिली.
advertisement
2/7
बेवारस बॅगची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS) तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मंदिर परिसर पूर्णतः रिकामा केला.
advertisement
3/7
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मंदिराबाहेर काढण्यात आले. काही काळासाठी मंदिराचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
advertisement
4/7
महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील अत्यंत गर्दीचे आणि संवेदनशील ठिकाण मानले जाते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
advertisement
5/7
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भाविक मंदिराच्या बाहेरच थांबून पोलिसांकडून पुढील सूचना मिळण्याची वाट पाहत आहेत.
advertisement
6/7
मंदिर प्रशासनाने भाविकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याची विनंती केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही सुरू असून ही बॅग कोणी आणि कधी ठेवली, याचा शोध घेतला जात आहे.
advertisement
7/7
तपास पूर्ण झाल्यानंतरच मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या संपूर्ण परिसर पोलिसांच्या नियंत्रणात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात हायअलर्ट, बेवारस बॅग सापडताच परिसर रिकामा; सर्व भाविकांना बाहेर काढलं