TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा कोल्ड वेव्हचं संकट, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही गारठा कायम राहणार आहे. पाहुयात रविवारी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7
महाराष्ट्रावर पुन्हा कोल्ड वेव्हचं संकट, या जिल्ह्यांना अलर्ट
उत्तर भारतातून येत असलेल्या वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्रात कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर , पुणे आणि सोलापूर या सात जिल्ह्यांमध्ये शीतलहरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही गारठा कायम राहणार आहे. पाहुयात रविवारी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. परंतु मागील दोन दिवसांत किमान तापमानात वाढ झाली आहे. रविवारी मुंबईतील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहील. तर आकाश निरभ्र राहील.
advertisement
3/7
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. पुणे आणि सोलापूरला हवामान विभागाने कोल्ड वेव्हचा इशारा दिला आहे. पुण्यात किमान तापमान 9 तर कमाल 29 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे वाढलेल्या गारठ्यात उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जळगावमध्ये 10 तर नाशिकमध्ये 11 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान राहील.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात कडाक्याची थंडी आहे. ही थंडीची लाट कायम राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 तर नांदेडमध्ये 13 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले जाईल.
advertisement
6/7
विदर्भात मात्र गारठ्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. किमान तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर अमरावती येथे किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
7/7
एकंदर, राज्यातील थंडीची लाट कायम आहे. मध्य महाराष्ट्रात तापमानात पारा लक्षणीय घट झाली आहे. तर विदर्भात मात्र गारठा कमी होणार आहे. बदलत्या वातावरणात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा कोल्ड वेव्हचं संकट, या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल