TRENDING:

Mumbai Metro Line 2B च्या पहिल्या टप्प्यात किती स्टेशन, किती असणार भाडं? बुधवारपासून धावणार मेट्रो!

Last Updated:
मेट्रो लाईन 9 नंतर मेट्रो लाईन 2 ब च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ह्या प्रोजेक्टला अखेर मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मेट्रो मार्गाची चर्चा सुरू होती. आता अखेर या मेट्रो मार्गाची सुरूवात झाली आहे.
advertisement
1/6
Mumbai Metro Line 2B च्या पहिल्या टप्प्यात किती स्टेशन, किती असणार भाडं? बुधवारपासून धावणार मेट्रो!
मेट्रो लाईन 2 ब या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आज हिरवा कंदील दाखवला आहे. ज्या प्रोजेक्टची गेल्या अनेक दिवसांपासून नोकरदार वर्ग वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला आहे. चेंबूर ते मंडाळे या मार्गावरील 5.53 किमीच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
advertisement
2/6
देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान- डायमंड गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार, मानखुर्द, महाराष्ट्र नगर आणि मंडाळे अशा 5.53 किमी मार्गावर मेट्रो लाईन 2 ब चा विस्तार केला जाणार आहे. मंडाळे जवळ मेट्रो रेल्वेसाठी एक मेट्रो डेपो सुद्धा उभारले जाणार आहे. ते मेट्रो डेपो आशियातील सर्वात मोठे डेपो असणार आहे.
advertisement
3/6
मेट्रो लाईन 2 ब च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, बीएमसीच्या महापौर सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवत मेट्रोची सफर सुद्धा केली.
advertisement
4/6
देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान ते महाराष्ट्र नगर- मंडाळे पर्यंत 5.53 किमीसाठी प्रतिप्रवासी 20 रूपये इतके भाडे भरावे लागणार आहे. जर तुम्हाला रिटर्न प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला प्रतिप्रवासी 40 रूपये द्यावे लागणार आहे. महा मुंबई मेट्रोच्या वेबसाईटवर माहिती तपासून प्रवाशांना अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
advertisement
5/6
अद्याप मेट्रो लाईन 2 ब चे संपूर्ण मार्ग सुरू झालेले नाहीत. त्याचे काम सुरू आहे. संपूर्ण मेट्रो लाईन 2 ब चे काम आटोपल्यानंतरच संपूर्ण मेट्रो सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
6/6
सध्या मुंबईमध्ये, चार लाईन सक्रिय आहेत. मेट्रो लाईन 1 जी घाटकोपर ते वर्सोवा, मेट्रो लाईन 2 अ दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, मेट्रो लाईन 2 ब देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान ते मंडाळे गाव (Under Construction), मेट्रो लाईन 3 कुलाबा- वांद्रे- सीप्झ (Partially Opreational), मेट्रो लाईन 7 ओवरीपाडा ते गुंदवली बाकी अद्याप मेट्रोचे काम सध्या सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Metro Line 2B च्या पहिल्या टप्प्यात किती स्टेशन, किती असणार भाडं? बुधवारपासून धावणार मेट्रो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल