TRENDING:

Weather Alert: रविवारी पुन्हा बदलली हवा, पुणे ते मुंबई अलर्ट नवा, आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: उत्तरेतून येणाऱ्या शीतलहरींचा जोर ओसरला आहे. त्यामुळे राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत.
advertisement
1/5
रविवारी पुन्हा बदलली हवा, पुणे ते मुंबई अलर्ट नवा, आजचं हवामान अपडेट
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात थंडीची लाट होती. आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे पुन्हा हवापालट झाली आहे. आज, 14 डिसेंबरला पुन्हा हवा बदलली आहे. थंडीची लाट ओसरली असून गारठा कायम आहे. आज मुंबई, पुण्यासह महत्त्वाचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज सकाळी हलका गारवा जाणवेल, मात्र कालच्या तुलनेत तापमान जवळपास समान राहणार आहे. किमान तापमान 18 ते 20 अंशांच्या दरम्यान असून दिवसा कमाल तापमान 30 ते 31 अंशांच्या आसपास राहील. दुपारच्या वेळेत उबदार हवामान जाणवेल, तर संध्याकाळनंतर पुन्हा सौम्य गारवा वाढेल. हवेत कोरडेपणा असल्याने उकाडा फारसा जाणवणार नाही. पुढील दोन दिवस या भागात तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही.
advertisement
3/5
पुणे शहर आणि परिसरात आजही थंडी मर्यादित स्वरूपातच राहणार आहे. शनिवारच्या तुलनेत आज सकाळी तापमानात फारसा फरक दिसलेला नाही. किमान तापमान 11 ते 13 अंशांच्या आसपास असून दिवसा तापमान 29 ते 30 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सकाळी थोडा गारवा आणि दुपारी उबदार हवा असा अनुभव राहील. घाटमाथ्याच्या भागांमध्ये थंडी किंचित जास्त जाणवू शकते, मात्र तीव्र गारठा किंवा कोल्ड वेव्हसारखी परिस्थिती नाही.
advertisement
4/5
अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर भागात आज सकाळी सौम्य थंडी जाणवली असून तापमान कालच्या तुलनेत किंचित वाढलेले आहे. किमान तापमान 11 ते 13 अंशांच्या दरम्यान तर कमाल तापमान 28 ते 30 अंशांच्या आसपास राहणार आहे. ग्रामीण भागात सकाळच्या वेळेत गारवा अधिक जाणवतो, मात्र दिवसा उबदार वातावरण राहील.
advertisement
5/5
दरम्यान, राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात ‘कोल्ड वेव्ह’सारखी स्थिती नाही. तसेच हवामान विभागाने सतर्कतेचा अलर्ट देखील दिलेला नाही. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात हवामान स्थिर, कोरडे राहणार आहे. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती राहणार आहे. तरीही हवामान बदलांमुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: रविवारी पुन्हा बदलली हवा, पुणे ते मुंबई अलर्ट नवा, आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल