TRENDING:

Lionel Messi : मेस्सीसाठी लाखो फॅन्स रस्त्यावर, नको ते सेलिब्रेटी पोहोचले; पण सुनील छेत्री कुठंच दिसला नाही, का?

Last Updated:
Sunil Chhetri Turns Down Meeting Lionel Messi : भारताचा महान फुटबॉल खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याला भेटण्याची आलेली ऑफर नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
1/7
नको ते सेलिब्रेटी पोहोचले; पण सुनील छेत्री कुठंच दिसला नाही, का?
मेस्सीचा तीन दिवसांचा भारत दौरा कोलकाता, हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई अशा चार शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र, मेस्सी या दौऱ्यात फुटबॉलऐवजी अन्य कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. तो तीन मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि विविध सेलिब्रिटी यांची भेट घेणार आहे.
advertisement
2/7
कोलकात्यात 70 फुटी पुतळ्याचे आभासी अनावरण करून त्याने आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्याच्यासोबत इंटर मियामीचे टीममेस्ट लुईस सुआरेझ (Luis Suarez) आणि रॉड्रिगो डी पॉल (Rodrigo de Paul) हे देखील आहेत.
advertisement
3/7
मेस्सी सध्या 'GOAT Tour' साठी भारत दौऱ्यावर असून, या भेटीने भारतीय फुटबॉलला कोणताही फायदा होणार नाही, असं छेत्रीचं मत आहे, ज्यामुळे त्याने मेस्सीला न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यामध्ये फुटबॉल-संबंधित उपक्रमांचा अभाव असल्याने छेत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
4/7
या दौऱ्यात फुटबॉल खेळाशी थेट संबंधित उपक्रम नसल्यामुळे छेत्रीने दुर्लक्ष केल्याचे वृत्त आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आयोजित केलेल्या अशा भेटीपेक्षा भारतीय फुटबॉलच्या विकासावर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्त्वाचे आहे, अशी छेत्रीची भूमिका आहे.
advertisement
5/7
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, छेत्री आणि मेस्सीची 14 डिसेंबर रोजी मुंबईत भेट होण्याची शक्यता आहे, परंतु हा एक 'वन-ऑफ' कार्यक्रम असेल, अशी माहिती आहे. यावर कोणतीही अधिकृत माहिती नाही.
advertisement
6/7
सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो आणि मेस्सीनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मेस्सी हा जगातील अव्वल संघांसोबत खेळतो तर भारतीय संघ अद्याप त्या स्थानावर पोहोचली नाही.
advertisement
7/7
आता विविध फुटबॉल लीगमुळे येत्या काळात अनेक सुनील छेत्री पहायला मिळतील, याच शंका नाही. भारतीयांची क्रेझ पाहता येत्या काळात आंतरराष्ट्रीय सामने देखील इथं खेळवले जाणार का? असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Lionel Messi : मेस्सीसाठी लाखो फॅन्स रस्त्यावर, नको ते सेलिब्रेटी पोहोचले; पण सुनील छेत्री कुठंच दिसला नाही, का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल