TRENDING:

ShaniDev: पहिल्या टप्प्याची साडेसाती आलीय! आधीपेक्षा वाईट दिवस या राशीला वर्षभर पाहायला लागणार

Last Updated:
Shani Astrology: राशीचक्रातील पहिली रास असलेल्या मेष राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ज्योतिषीय गणितांनुसार, चंद्र राशीनुसार बाराव्या घरात शनीचं भ्रमण साडेसाती आणणारे आहे. नवीन वर्ष 2026 हे मेष राशीच्या लोकांना आत्मपरीक्षण, बदल आणि जीवनाची नवी दिशा ठरवण्याचं संकेत देत आहे.
advertisement
1/6
पहिल्या टप्प्याची साडेसाती! आधीपेक्षा वाईट दिवस या राशीला वर्षभर पाहावे लागतील
या काळात जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. काही परिस्थिती आव्हानात्मक असू शकतात, पण हा काळ धैर्य, शिस्त आणि समजूतदारपणाने पुढे जाण्याचाही असेल. मेष राशीच्या लोकांना 2026 मध्ये नवीन बदलांना तयार राहावं लागेल, नववर्षाबद्दल ज्योतिष अभ्यासक मेष राशीच्या भविष्याबद्दल काय म्हणतात, ते जाणून घेऊया.
advertisement
2/6
नोकरी आणि व्यापार -2026 मध्ये मेष राशीच्या लोकांना कामात मेहनतीनुसार परिणाम मिळणार नाहीत. शनीचं बाराव्या घरातून भ्रमण आणि गुरूचं पूर्ण सहकार्य न मिळणं हे यामागचं मुख्य कारण असेल. विदेशाशी संबंधित व्यापार (आयात-निर्यात) करणाऱ्यांसाठी काळ तुलनेनं चांगला राहील, मात्र यश अडथळ्यांनंतर मिळेल. वर्षाच्या सुरुवातीपासून 20 जानेवारीपर्यंत गुरूचा प्रभाव शनीवर राहील, ज्यामुळे परिस्थिती थोडी सोपी दिसेल.
advertisement
3/6
मेष राशीला 2026 मध्ये व्यावहारिक सल्ला -जानेवारी आणि एप्रिल 2026 मध्ये आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्ही व्यावहारिक गुंतवणूक आणि आर्थिक व्यवस्थापनाकडे वळाल. गुरू ग्रहाच्या प्रभावामुळे नवीन वर्ष 2026 मध्ये तुमचे उत्पन्न वाढण्याचे योग बनत आहेत, परंतु अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही बाबतीत घाई करणे टाळा.
advertisement
4/6
आर्थिक कंडिशन -साल 2026 आर्थिकदृष्ट्या सरासरीपेक्षा चांगले राहील. उत्पन्न आणि करिअर दोन्हीमध्ये सामान्य परिणाम मिळतील. अचानक धनलाभाचे योग नाहीत, कमाई पूर्णपणे मेहनतीवर अवलंबून राहील. शनी बाराव्या घरात असल्यामुळे लाभासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. लाभस्थानातील राहूचं भ्रमण चांगली कमाई मिळवून देऊ शकते. शनीच्या दृष्टीमुळे बचत करण्यात अडचणी येऊ शकतात. जानेवारी ते 2 जूनपर्यंत गुरू उत्पन्नासाठी सहायक राहील. 2 जूननंतर खर्च वाढू शकतात, ज्यामुळे बचतीवर परिणाम होईल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा गुरूचं सहकार्य मिळेल. एकूणच, कमाई चांगली होईल, पण बचत तुलनेनं कमी होईल.
advertisement
5/6
आरोग्य - साल 2026 आरोग्याच्या दृष्टीने सरासरी असेल. बाराव्या घरात शनीचं भ्रमण (साडेसाती) आरोग्यासाठी अनुकूल नाही. झोपेची समस्या आणि पायांशी संबंधित त्रास दुर्लक्ष करू नका. हृदयविकाराचे रुग्ण आणि आधीपासूनच आजारी असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. मंगळ 2 मे 2026 पर्यंत अस्त राहील, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आरोग्यावर अधिक लक्ष द्या. गर्दीच्या किंवा अस्वस्थ वातावरणापासून दूर रहा.
advertisement
6/6
नातेसंबंध - प्रेम जीवन 2026 मध्ये तसे चांगले राहू शकते. 5 डिसेंबरपर्यंत पंचम स्थानावर केतूचा प्रभाव राहील, ज्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. निष्ठा कायम ठेवल्याने नाते सुरक्षित आणि मजबूत राहतील. लहान-सहान कुरबुरी असूनही जोडीदाराची साथ मिळेल. 2 जूनपर्यंत प्रेम जीवनात मोठ्या समस्यांचे योग नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गुरूचे विशेष सहकार्य मिळेल. नात्याबद्दल गंभीर आणि निष्ठावान असलेल्या लोकांसाठी काळ अनुकूल राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: पहिल्या टप्प्याची साडेसाती आलीय! आधीपेक्षा वाईट दिवस या राशीला वर्षभर पाहायला लागणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल