TRENDING:

बुमराहचं ब्रम्हास्त्र निकामी होतंय! टी-20 वर्ल्ड कपसाठी 45 मिनिटात तयार केलं नवं हत्यार, पहिला प्रयोग साऊथ अफ्रिकेवर

Last Updated:
Jasprit bumrah practice yorkers in Nets : साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला आपलं प्रमुख अस्त्र असलेला यॉर्कर बॉल फेकताना समस्या जाणवत होती. अशातच बुमराहने प्रॅक्टिस सेशनमध्ये यावर उपाय शोधून काढला आहे.
advertisement
1/7
बुमराहचं ब्रम्हास्त्र निकामी होतंय! 45 मिनिटात तयार केलं नवं हत्यार
टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमधून बाहेर आल्यानंतर त्याच्या बॉलिंगची धार कमी झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट मालिकेनंतर बुमराहची बॉलिंग बोथट झालीये.
advertisement
2/7
जसप्रीत बुमराह कधीही मॅच पलटू शकतो याची जाणीव सर्वांना आहे. पण महत्त्वाच्या सामन्यात बुमराहची रणनिती फेल ठरताना दिसतीये. अशातच आता बुमराहने यावर उपाय शोधून काढला आहे.
advertisement
3/7
साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला आपलं प्रमुख अस्त्र असलेला यॉर्कर बॉल फेकताना समस्या जाणवत होती. अशातच बुमराहने प्रॅक्टिस सेशनमध्ये यावर उपाय शोधून काढला आहे.
advertisement
4/7
प्रॅक्टिस सेशलनमध्ये जसप्रीत बुमराहने बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कल याच्यासोबत नेट्समध्ये तब्बल 45 मिनिटं सराव केला. त्यावेळी त्याने सगळेच्या सगळे बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. मॉर्कलने देखील बुमराहला मार्गदर्शन केलं.
advertisement
5/7
सध्या हिवाळा असल्याने मॅचमध्ये दव पहायला मिळतात. दवामुळे बॉल लवकर ओला होता अन् बॉलर्सला पाहिजे त्या ठिकाणी बॉलिंग करता येत नाही. दुसऱ्या मॅचमध्ये बुमराहच्या हातातून बॉल फुट टॉस पडत असल्याचं पहायला मिळालं होतं.
advertisement
6/7
आता वर्ल्ड कप देखील हिवाळ्याच्या शेवटात होणार असल्याने अशा परिस्थितीचा सामना भारतीय बॉलर्सला करावा लागणार आहे. त्यासाठी आता बुमराहने त्याचं प्रमुख अस्त्र असलेल्या यॉर्करवर कमांड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
advertisement
7/7
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने जसप्रीत बुमराहचा फॉ़र्म टीम इंडियाचा महत्त्वाचा आहे. एका बाजूने अर्शदीप आपली जादू दाखवतोय पण दुसरीकडे बुमराहला देखील आपल्या तलवारीला धार करावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
बुमराहचं ब्रम्हास्त्र निकामी होतंय! टी-20 वर्ल्ड कपसाठी 45 मिनिटात तयार केलं नवं हत्यार, पहिला प्रयोग साऊथ अफ्रिकेवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल