Weather Alert: कोकणात थंडीचा कडाका, मुंबई-ठाण्याचा पारा पुन्हा घसरणार, आजचं हवामान अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईसह कोकणातील बुधवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

डिसेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढू लागली आहे. राज्यातील काही भागात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे, विशेषत: विदर्भ आणि मराठवाडा परिसरात गारठा व थंड वाऱ्याची तीव्रता वाढल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातील बुधवार, 3 डिसेंबर रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबईत थंडीचा प्रभाव आणखीन स्पष्ट होत आहे. किमान तापमान 19–20°C पर्यंत खाली आले असून सकाळी हलका गारवा जाणवतो. दिवसा तापमान 29–30°C च्या आसपास राहणार आहे. वातावरण पूर्णपणे स्वच्छ असून आकाश निरभ्र राहील. समुद्राकडून वाहणारा थंड वारा सतत असल्यामुळे संध्याकाळी हवेत थंडावा अधिक जाणवेल.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईत तापमानात 1-2 अंशांची आणखी घट दिसत आहे. किमान तापमान 17–19°C, तर दिवसा तापमान 29–31°C दरम्यान राहील. सकाळी गार वाऱ्यामुळे थंडी जास्त जाणवेल. हवेत कोरडेपणा असल्याने पावसाची कोणतीही शक्यता नाही. दिवसा हलकी उष्णता जाणवली तरी वातावरण थंडच राहील.
advertisement
4/5
पालघरमध्ये उष्णतेपेक्षा गारवा अधिक आहे. किमान तापमान 15–17°C पर्यंत घसरले आहे, जे कोकण आणि मुंबईच्या तुलनेत कमी आहे. दिवसा तापमान 28–30°C दरम्यान राहणार आहे. सकाळी धुरकेसारखा गारवा जाणवण्याची शक्यता आहे. आकाश स्वच्छ आणि हवा कोरडी राहील.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग कोकणातील या तीनही जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम आहे. रायगडच्या काही भागात तापमान 16–17°C पर्यंत घसरले आहे. दिवसा तापमान 30–32°C दरम्यान असेल. सायंकाळी गार वाऱ्याचा प्रभाव जास्त असून हवामान कोरडेच राहणार आहे. पावसाचा कोणताही अंदाज नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: कोकणात थंडीचा कडाका, मुंबई-ठाण्याचा पारा पुन्हा घसरणार, आजचं हवामान अपडेट