TRENDING:

Mumbai Rain: आजचा दिवस पावसाचा! मुंबई, ठाण्यात मुसळधार, कोकणात हायअलर्ट!

Last Updated:
Mumbai Rain: कोकणात गेल्या काही काळात मान्सूनचा जोर कायम आहे. आज पुन्हा अतिमसुळधार पावसाची शक्यता असून मुंबई, ठाण्याला देखील अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5
Mumbai Rain: आजचा दिवस पावसाचा! मुंबई, ठाण्यात मुसळधार, कोकणात हायअलर्ट!
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीपासून मुंबई परिसरात मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे. बुधवारी दिवसभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज 3 जुलै 2025 रोजी देखील पावसाची तीव्रता कायम राहणार असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरला यलो तर कोकणात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, पहाटेपासूनच काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. दुपारनंतर काही भागांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने आज मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बुधवारी दिवसभरात शहरात 45 मिमी पावसाची नोंद झाली होती. आजचा पाऊस तुलनेत सौम्य असला, तरी दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरात 2 जुलै रोजी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. आज दिवसभर ढगाळ हवामान असून, अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. बेलापूर, घणसोली, कल्याण-डोंबिवली भागांत नागरिकांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खबरदारी घ्यावी. आज या भागात तापमान 27°C ते 30°C पर्यंत असेल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
4/5
पालघरमध्ये आज सकाळपासून ढगाळ हवामान असून, पहाटेपासूनच सलग सरी पडत आहेत. डहाणू, तलासरी, वाडा परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने आजही मध्यम स्वरूपाच्या सरींचा इशारा दिला असून, शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
5/5
संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आजही पावसाचा जोर राहणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. मच्छीमार बांधवांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: आजचा दिवस पावसाचा! मुंबई, ठाण्यात मुसळधार, कोकणात हायअलर्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल