Weather Alert: महाराष्ट्र तापला, त्यात नव्या संकटानं वाढवलं टेन्शन, 5 मार्चला 'या' जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढलेला असतानाच कोकणात वेगळाच अलर्ट देण्यात आला आहे. 5 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/7

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. महाराष्ट्रात तापमानाचा पारा 38 अंशांच्या पार गेला आहे. उष्ण, कोरडे आणि काही ठिकाणी दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 5 मार्च रोजी राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता नाही. मात्र, काही भागात उष्णतेत मोठी वाढ होण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांना उष्ण आणि आद्र हवामानासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणात सध्या विचित्र हवामान स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान असून रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना आज उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कमाल तापमान 32-37 अंशांवर गेलं असून किमान 24-27 अंशांपर्यंत राहील. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह इतर जिल्ह्यांत तापमानाचा पारा चढला आहे. कमाल तापमान 34-38 अंशांपर्यंत राहील. तर किमान तापमान 20-24 अंशांपर्यंत नोंदवले जाईल. तापमानात हळूहळू वाढ होत असून नागरिकांना दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक हलक्या पावसाची शक्यता असली तरी बहुतांश भागात मुख्यत: हवामान कोरडे राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात हवामान मुख्यत: उष्ण आणि कोरडे राहील. नाशिकसह इतर जिल्ह्यांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान 20-24 अंश तर कमाल तापमान 36-39 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तापमान सरासरी पेक्षा जास्त राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
5/7
मराठवाड्यातील नागरिकांना उष्ण आणि कोरड्या हवामानाने हैराण केले आहे. छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या सर्वच जिल्ह्यांत तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमान 35-39 अंश तर किमान 20-24 अंश सेल्सिअसवर राहील. किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही.
advertisement
6/7
विदर्भात देखील उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भात हवामान कोरडे आणि तीव्र उष्ण राहील. कमाल तापमान चाळीशी गाठण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानाचा पारा 21 ते 25 अंशांच्या दरम्यान राहील. पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
7/7
दरम्यान, महाराष्ट्रातील हवामान आणि तापमानात मोठे बदल जाणवत आहेत. मार्चच्या सुरुवातीलाच ऊन तापलं आहे. हवामान विभागानुसार उष्णतेचा पारा 2-4 अंशांनी वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्र तापला, त्यात नव्या संकटानं वाढवलं टेन्शन, 5 मार्चला 'या' जिल्ह्यांना अलर्ट