Weather Alert: महाराष्ट्रात 24 तासांत वारं फिरलं, अवकाळी संकट नाही, आता वेगळाच अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल होत आहेत. 5 फेब्रुवारीला हवामान कसं असेल? जाणून घेऊ.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवरीमध्ये मोठे बदल जाणवत आहेत. 5 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामान कोरडे आणि मुख्यतः स्थिर राहणार आहे. कुठल्याही भागात पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी सकाळी आणि रात्री हलकी थंडी जाणवेल, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याने तापमानात थोडी वाढ होण्याचे संकेत आहेत.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी या भागांमध्ये हवामान स्वच्छ आणि कोरडे राहील. सकाळच्या वेळेस सौम्य गारवा जाणवेल, तर दुपारी उष्णता वाढलेली दिसेल. किमान तापमान साधारण 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान, तर कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे संध्याकाळी हवामान थोडे सुखद राहील.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात सकाळी थंडी जाणवेल, विशेषतः ग्रामीण भागात गारवा अधिक असेल. दिवसभर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता असून उन्हाची तीव्रता हळूहळू वाढेल. किमान तापमान 14 ते 17 अंश, तर कमाल तापमान 30 ते 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.
advertisement
4/5
मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागांत हवामान कोरडे राहील. सकाळी सौम्य थंडी आणि दुपारी उष्णता जाणवेल. काही भागांमध्ये किमान तापमान 13 ते 16 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान 31 ते 34अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते.
advertisement
5/5
एकंदरीत महाराष्ट्राचा हवामान आढावा हा 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही. हवामान कोरडे, स्वच्छ आणि स्थिर राहणार आहे. सकाळी आणि रात्री थोडी थंडी, तर दिवसा उन्हाचा चांगलाच प्रभाव जाणवेल. पुढील काही दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून हिवाळ्याचा प्रभाव कमी होत चालल्याचे संकेत मिळत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात 24 तासांत वारं फिरलं, अवकाळी संकट नाही, आता वेगळाच अलर्ट