Weather Alert: महाराष्ट्रावरचं अवकाळी संकट टळलं, अचानक वारं फिरलं, आज वेगळाच अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून थंडीची तीव्रता कमी झाली आहे. 6 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

गेले दोन ते तीन दिवस मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये दुपारच्या वेळेस चांगलाच उन्हाचा चटका जाणवत आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये अजूनही सकाळी व रात्री थंडी जाणवत आहे. आता बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांना मिश्र स्वरूपाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यापुढे कुठेही तीव्र थंडी पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्याचा काळ हा हिवाळ्याचा शेवटचा टप्पा मानला जात आहे. 6 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी या भागांमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. सकाळच्या वेळेस सौम्य गारवा जाणवेल, तर दुपारच्या वेळेस सूर्यप्रकाशामुळे उष्णता वाढेल. कमाल तापमान साधारण 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. समुद्रकिनाऱ्यालगत हलका वारा वाहत राहील, त्यामुळे संध्याकाळी वातावरण काहीसे आरामदायी राहील
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात सकाळी हलकी थंडी जाणवेल. दिवसभर हवामान कोरडे राहील आणि आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्यप्रकाश चांगला मिळेल. त्यामुळे दुपारच्या वेळेस तापमान वाढून उष्ण वातावरण निर्माण होईल. या भागात कमाल तापमान साधारण 30 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.
advertisement
4/5
मराठवाडा आणि विदर्भातील भागातही हवामान कोरडेच राहणार आहे. सकाळी आणि रात्री थोडा गारवा जाणवेल, मात्र दिवसा उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर किमान तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. कुठेही पावसाची शक्यता नाही.
advertisement
5/5
एकंदरीत महाराष्ट्राचा हवामान अंदाज हा संपूर्ण महाराष्ट्रात 6 फेब्रुवारी रोजी हवामान कोरडे आणि स्थिर राहील. हिवाळ्याची तीव्रता कमी होत असल्याने दिवसा उष्णता वाढत जाणार आहे, तर सकाळी आणि रात्री सौम्य थंडी जाणवेल. तापमानात हळूहळू वाढ होत राहील, मात्र पावसासारखी कोणतीही स्थिती राज्यात कुठेही दिसणार नाही
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रावरचं अवकाळी संकट टळलं, अचानक वारं फिरलं, आज वेगळाच अलर्ट