TRENDING:

Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं! ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाणे-मुंबईत गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 6 फेब्रुवारीचं कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
24 तासांत वारं फिरलं! ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट
गेल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईकरांना हैराण करणारा उकाडा जाणवत आहे. येत्या आठवड्याभरात कोकणातील कमाल तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, 6 फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवलीतील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यात हवामान मुख्यत्वे उष्ण आणि कोरडे राहील. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाईल. पुढील 6 दिवस कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात दुपारच्या वेळी जास्त उकाडा जाणवू शकतो.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवली शहरात हवामान मुख्यत्वे सूर्यप्रकाशित, कोरडे आणि उष्ण असेल. गुरुवारच्या तुलनेत आज थंडीचा जोर ओसरून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळेल. कमाल तापमान 35-37 अंश सेल्सिअस, तर किमान 21-22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुपारी उष्णतेचे चटके जाणवू शकतात.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान मागील दोन दिवसांपासून स्थिर असल्याने आज शुक्रवारी हवामान कोरडे, स्वच्छ आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. दिवसा कडक ऊन असल्याने उकाडा जाणवेल.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान मुख्यत्वे उष्ण आणि कोरडे राहील. किमान तापमानात वाढ़ होऊन 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहील. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील वातावरणात बदल झाले असून हवामान बहुधा निरभ्र किंवा अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 32 अंश तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस असेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हवामान बहुधा निरभ्र किंवा अंशतः ढगाळ राहील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19अंश सेल्सिअस असेल, सकाळ -संध्याकाळ हलकी थंडी असल्याने दिवसभर ऊबदारपणा असेल, बदलत्या हवामानामुळे आरोग्याची (विशेषतः सर्दी-खोकला) काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं! ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल