TRENDING:

Weather Alert: ना थंडीची लाट, ना पावसाची शक्यता, महाराष्ट्रावर वेगळंच संकट, 24 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीमध्ये सातत्याने बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/5
ना थंडीची लाट, ना पावसाची शक्यता, महाराष्ट्रावर वेगळंच संकट, 24 तासांसाठी अलर्ट
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. फेब्रुवारीत दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत आहे. काही ठिकाणी तापमान 37 अंशांच्या वर गेलं असून नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. 19 फेब्रुवारी रोजी देखील राज्यात अशाच प्रकारचे कोरडे आणि उष्ण हवामान राहील. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात उष्ण व दमट वातावरण राहील. मुंबई येथे कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर किमान तापमान 22 ते 24 अंशांच्या आसपास नोंदवले जाईल. आर्द्रता जास्त असल्याने दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवेल. समुद्रकिनारी भागात दुपारी उष्णतेची तीव्रता वाढेल, तर सकाळ-संध्याकाळ तुलनेने सौम्य वातावरण राहील.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात सकाळी हलका गारवा जाणवेल. किमान तापमान 17 ते 19 अंशांच्या दरम्यान राहील. मात्र दुपारच्या वेळी सूर्यप्रकाश तीव्र होईल आणि कमाल तापमान 35 ते 37 अंशांपर्यंत जाईल. खुल्या भागांत उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. संध्याकाळनंतर तापमानात किंचित घट होईल, तरी दिवसभर उकाडा कायम राहील.
advertisement
4/5
विदर्भ आणि मराठवाडा विभागात कोरडे व उष्ण हवामान कायम राहील. मराठवाड्यात कमाल तापमान 36 ते 38 अंशांपर्यंत पोहोचेल, तर किमान तापमान 16 ते 19 अंशांच्या दरम्यान राहील. विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक राहील; काही भागांत कमाल तापमान 38 ते 39 अंशांपर्यंत नोंदवले जाईल, तर किमान तापमान 18 ते 21अंशांच्या आसपास राहील. दुपारच्या वेळेत कडक ऊन राहील.
advertisement
5/5
एकंदरीत 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे आणि उष्ण हवामान राहील. कालच्या तुलनेत तापमानात सुमारे 1 अंशांची वाढ नोंदवली जाईल. पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारचे हवामान कायम राहील आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होत राहील. सकाळचा गारवा आणखी कमी होईल आणि दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता वाढेल. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: ना थंडीची लाट, ना पावसाची शक्यता, महाराष्ट्रावर वेगळंच संकट, 24 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल