Weather Alert: 21 जानेवारीला वारं फिरलं, कुठं थंडी तर कुठं वेगळाच अलर्ट, कसं असेल हवामान?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात जानेवारीच्या उत्तरार्धात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 21 जानेवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

जानेवारीचा उत्तरार्ध जवळ येत असताना महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल जाणवू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत काही भागांत सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका वाढलेला दिसत असला, तरी दिवसा तापमानात वाढ होत असल्याचं चित्र आहे. साधारणपणे जानेवारीच्या मध्यावर थंडी कमी होण्यास सुरुवात होते आणि त्याचेच संकेत सध्या राज्यभर पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतात सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होत नसला, तरी काही भागांत आकाशात ढगांची उपस्थिती दिसू शकते. पाहूयात, 21 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहणार आहे.
advertisement
2/5
कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात हवामान प्रामुख्याने कोरडं ते आंशिक ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि संध्याकाळी हवेत हलका गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळी उष्णतेचा प्रभाव वाढेल. मुंबईत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 18 ते 22 अंशांच्या आसपास असेल. समुद्रकिनारी मध्यम वेगाचे वारे वाहतील, मात्र पावसाची शक्यता नाही.
advertisement
3/5
पश्चिम महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत हलकं धुकं किंवा ढगाळ वातावरण दिसू शकतं. येथे कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 ते 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्णता वाढेल, त्यामुळे सकाळचा गारवा आणि दुपारचा उकाडा असा मिश्र अनुभव नागरिकांना येऊ शकतो.
advertisement
4/5
मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक परिसरात हवामान प्रामुख्याने कोरडं राहील. कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं, तर किमान तापमान 15 ते 18 अंशांच्या दरम्यान राहील. ढगाळ वातावरण फक्त काही काळासाठी दिसू शकतं, पण पावसाची शक्यता नाही.
advertisement
5/5
एकूणच, 21 जानेवारी रोजी महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होऊन उबदार हवामान अनुभवास येईल. सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी जाणवेल, तर दुपारच्या वेळी उष्णता वाढेल. बदलत्या हवामानामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: 21 जानेवारीला वारं फिरलं, कुठं थंडी तर कुठं वेगळाच अलर्ट, कसं असेल हवामान?