Weather Alert: विजा कडाडणार, वादळी पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात पुन्हा अलर्ट, तुमच्या जिल्ह्याचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रावर अस्मानी संकट घोंघावत असून आज पुन्हा गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रात मराठी नववर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने झाले. गुरुवारी राज्यातील 21 जिल्ह्यांना यलो तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. आज पुन्हा काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात हवापालट झाली असून हवामान कोरडे राहील. 20 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
विदर्भावर हवामानाचं तिहेरी संकट कायम आहे. एकीकडे उष्णतेचा पारा चाळिशीच्या घरात असतानाच अस्मानी सकंट झोडपत आहे. वादळी वारे आणि गारपीट देखील होतेय. त्यामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील शेतकरी अडचणीत आले हेत. आज चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट असून इतर जिल्ह्यांत देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/7
मराठवाड्यात सोसाट्याच्या वारा आणि विजांसह पावसाचा यलो अलर्ट कायम आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव भागात पावसाचा जोर राहील. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. पुढील 48 तास मराठवाड्यात पावसाचा इशारा आहे. त्यानंतर पुन्हा हवापालट होईल. कमाल तापमान 35-37 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. पुढील 48 तासांसाठी सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल. काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात मात्र कोरडे हवामान राहील.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात आज प्रामुख्याने कोरडे आणि अंशत: ढगाळ हवामान राहील. नाशिकसह, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. मात्र, आज खानदेशाला कोणताही महत्त्वाचा अलर्ट आहे.
advertisement
6/7
कोकणातील अस्मानी संकट टळलं असून पुन्हा वारं फिरलं आहे. आज मुंबईसह बहुतांश कोकणात पावसाची शक्यता नाही. हवामान मुख्यत: ढगाळ आणि दमट राहील. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उकाडा जास्त जाणवेल. तर काही भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस होईल. कमाल तापमान 32-35 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
7/7
एकूणच, राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज पुन्हा यलो अलर्ट आहे, तर उर्वरित भागात उष्णतेची लाट आणि उकाडा वाढला आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान्य सुरक्षित ठेवावे आणि हवामान अपडेट तपासत राहावे, असे आवाहन आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: विजा कडाडणार, वादळी पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात पुन्हा अलर्ट, तुमच्या जिल्ह्याचं अपडेट