Weather Alert: ऑक्टोबरचा शेवट पावसानेच! शुक्रवारी कुठं कोसळणार? मुंबईसह कोकणचं हवामान अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून पावसाळाच सुरू असल्याचे चित्र आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस देखील कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 
advertisement
1/5

 ऑक्टोबरचा शेवटचा दिवस असूनही महाराष्ट्रात पावसाचं सत्र कायम आहे. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस आता जवळपास सहा महिने उलटूनही पूर्णपणे थांबलेला नाही. तुरळक रिमझिम नव्हे, तर काही ठिकाणी अजूनही जबरदस्त पाऊस कोसळतोय. आज म्हणजेच 31 ऑक्टोबर 2025 रोजी हवामान विभागाने पालघर आणि रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित भागात मध्यम ते हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
2/5
 मुंबईत गुरुरवारी सकाळच्या सुमारास रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. दिवसभर आभाळ ढगाळ आणि दुपारच्या वेळेस थंडगार होतं. आजही म्हणजे 31 ऑक्टोबरला मुंबईत सकाळी आभाळ भरलेलं दिसेल, तर दुपारनंतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. कमाल तापमान 31 अंश तर किमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील अशी शक्यता आहे.
advertisement
3/5
 ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी 30 ऑक्टोबर रोजी सुद्धा काही भागांमध्ये रिमझिम सरी पडल्या. आज या भागात आंशिक ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर काही ठिकाणी मध्यम सरींचा अंदाज वर्तवला आहे. या भागात वाऱ्याचा वेग 25 ते 35 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
 पालघरला आज हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. इथे सकाळपासूनच आभाळ भरून आलं असून काही ग्रामीण भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
advertisement
5/5
 कोकण किनारपट्टीवर अजूनही पावसाने विश्रांती घेतलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत सरींचा सिलसिला सुरू असून आज रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. सकाळपासूनच इथे वातावरण आभाळ भरलेलं असलं तरी, पावसाचा जोर कमी झालेला दिसतो. तरीदेखील या किनारपट्टीवर हवामान ढगाळ आणि दमट राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: ऑक्टोबरचा शेवट पावसानेच! शुक्रवारी कुठं कोसळणार? मुंबईसह कोकणचं हवामान अपडेट