66 किलो सोनं आणि 295 किलो चांदी, देशातील सर्वात श्रीमंत बाप्पाचे पाहा Photos
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
सध्या देशात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. पण भारतातील सर्वात श्रीमंत गणपती आपल्याला माहितीये का? इथं पाहा.
advertisement
1/5

सध्या देशभर गणेशोत्सवाची धूम आहे. देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी मुंबईतील गणेश उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. येथील मोठ मोठ्या गणेश मूर्ती अनेकांना भुरळ घालतात. परंतु, GSB सेवा मंडळाचा गणेशोत्सव सर्वात श्रीमंत गणेश मूर्तीसाठी चर्चेत असतो.
advertisement
2/5
दरवर्षीप्रमाणे यंदाही GSB सेवा मंडळाच्या महागणपतीची जोरदार चर्चा आहे. कदाचित भारतातील सर्वात श्रीमंत मूर्ती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गणरायाची सजावटही अतिशय भव्य दिव्य असते. यंदा हा महागणपती 66.5 किलो सोन्याचे दागिने, 295 किलो चांदीसह इतर मौल्यवान दागिन्यांनी सजवण्यात येणार आहे.
advertisement
3/5
मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळाने सांगितले की, यंदा सेवा मंडळ शहराच्या पूर्व भागातील किंग्ज सर्कल येथे 69 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी सेवा मंडळाने पहिल्यांदाच सर्व ठिकाणी फेशियल रेकग्निशन कॅमेरे बसवले आहेत.
advertisement
4/5
GSB सेवा मंडळाने सांगितले की, यावर्षी त्यांनी 360.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. दुसरीकडे, भाविकांना लक्षात घेऊन आयोजकांनी क्यूआर कोड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची व्यवस्था केलीय.
advertisement
5/5
या गणपती उत्सवात राम मंदिराच्या यशस्वी उभारणी आणि उद्घाटनासाठी विधीही आयोजित केले जातील, असे सेवा मंडळाच्या एका आयोजकाने सांगितले. (फोटो: ANI साभार)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
66 किलो सोनं आणि 295 किलो चांदी, देशातील सर्वात श्रीमंत बाप्पाचे पाहा Photos