थिएटरमध्ये जाण्याआधी पोट भरूनच जा, पहिल्या भागापेक्षाही मोठा आहे Dhurandhar 2, मोठा धमाका करायला 'हमजा' तयार!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2 Runtime: 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने ३ तास ३४ मिनिटांच्या रनटाइमसह खळबळ उडवली होती. पण त्याचा सिक्वेल तर दोन पावलं पुढे निघाला आहे.
advertisement
1/8

सध्या बॉलिवूड प्रेमी फक्त एकाच फिल्मची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २. पहिल्या भागाने रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या भागात कोणता धमाका पाहायला मिळणार, ते पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
2/8
धुरंधरच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना वेड लावलं खरं, पण चित्रपटाच्या लांबीने अनेकांना धक्का दिला होता. असे असले तरीही चित्रपटाच्या कथेला आणि प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यश आले.
advertisement
3/8
'धुरंधर'च्या पहिल्या भागाने ३ तास ३४ मिनिटांच्या रनटाइमसह खळबळ उडवली होती. पण त्याचा सिक्वेल तर दोन पावलं पुढे निघाला आहे. नुकतंच याबाबत माहिती समोर आली असून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
4/8
हा चित्रपट केवळ अ‍ॅक्शनमध्येच नाही, तर लांबीच्या बाबतीतही 'धुरंधर' ठरला आहे. तब्बल ३ तास ५५ मिनिटांचा हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील आजवरचा चौथा सर्वात लांब चित्रपट ठरला आहे.
advertisement
5/8
३ तास ५५ मिनिटांच्या या चित्रपटाचा सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंका नाही, पण चित्रपटगृहांच्या मालकांसाठी मात्र हे डोकेदुखी ठरली आहे. इतक्या मोठ्या लांबीमुळे सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये एका दिवसात फक्त ४ शो लावता येतील, ज्यामुळे कमाईवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
6/8
बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात लांब चित्रपटांच्या यादीत आता 'धुरंधर २' ने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या यादीमध्ये एलओसी: कारगिल (२००३) ४ तास १५ मिनिटांचा असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ४ तास ८ मिनिटांचा मेरा नाम जोकर (१९७०) आहे. ३ तास ५८ मिनिटांचा संगम (१९६४) तिसऱ्या क्रमांकावर असून पाचव्या क्रमांकावर ३ तास ५३ मिनिटांचा लगान (२००१) आहे.
advertisement
7/8
'धुरंधर: द रिव्हेंज' मध्ये रणवीर सिंग सोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि अक्षय खन्ना (कॅमिओ) यांसारखी तगडी फौज पाहायला मिळणार आहे. सारा अर्जुन, गौरव गेरा आणि राकेश बेदी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
8/8
हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होत असून, १८ मार्चला संध्याकाळी ५ वाजल्यापासून त्याचे पेड रिव्ह्यू शो सुरू होणार आहेत. दरम्यान, रिलीजच्या आधीच धुरंधर २ ने कमाईचे रेकॉर्ड्स बनवायला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थिएटरमध्ये जाण्याआधी पोट भरूनच जा, पहिल्या भागापेक्षाही मोठा आहे Dhurandhar 2, मोठा धमाका करायला 'हमजा' तयार!