Mumbai Rain: वादळी वारा अन् धो धो धारा, मुंबई-ठाण्याला झोडपणार, कोकणात पुन्हा हायअलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: कोकणात मान्सूनचा जोर वाढला असून पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसराचा 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण विभागात दिवसभर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/5
मुंबईत पहाटेपासून ढगाळ वातावरण असून, सकाळी हलक्या सरी पडल्यानंतर दुपारी व संध्याकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात शहरातील कमाल तापमान 30 अंशांपर्यंत राहील. दमट हवामान आणि आर्द्रतेचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर जाणवण्याची शक्यता आहे. काही सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज संपूर्ण दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. दुपारनंतर काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांचा कडकडाट व वाऱ्याचा जोर जाणवू शकतो. हवामान विभागाने 24 तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे. आज तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. शालेय वाहतूक व कार्यालयीन वेळांना थोडासा अडथळा येण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
पालघरमध्ये हवामान विभागाने दिवसभर सतत हलक्या ते मध्यम सरींचा इशारा दिला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे. स्थानिक प्रशासनाने मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
5/5
कोकणात मान्सून अधिक प्रभावी झाला असून हवामान विभागाने काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. सकाळपासूनच हलक्या सरी सुरू होतील, तर दुपारनंतर काही भागांत मुसळधार पावसाच्या सरी पडू शकतात. रायगड, रत्नागिरीला दक्षतेचा ऑरेंज तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट दिला आहे. जोरदार पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, तसेच किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: वादळी वारा अन् धो धो धारा, मुंबई-ठाण्याला झोडपणार, कोकणात पुन्हा हायअलर्ट