Weather Alert: पाऊस परत आलाय! ढगांचा गडगडाट अन् वादळी वारे, मुंबईसह ठाण्याला नवा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे आज ठाण्यात सायंकाळच्या वेळी सुसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
advertisement
1/5

राज्यातील 13 जिल्ह्यांना हवामान खात्याने आज पावसाचा यलो अलर्ट दिला होता. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता होती.
advertisement
2/5
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही भागांमध्ये आज ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी पडतील असे सांगण्यात आले होते. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे आज ठाण्यात सायंकाळच्या वेळी सुसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
advertisement
3/5
हवामान खात्याने 15 ऑक्टोबरपासून मुंबई, ठाणेसह उपनगरांना अलर्ट दिला होता. त्यानुसार ठाण्यात विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला.
advertisement
4/5
दरम्यान, हवामान खात्याने येणाऱ्या 6 ते 7 दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
5/5
मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच अधूनमधून सौम्य पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे, असं ही हवामान खात्याने सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: पाऊस परत आलाय! ढगांचा गडगडाट अन् वादळी वारे, मुंबईसह ठाण्याला नवा अलर्ट