TRENDING:

ठाणे, कल्याण आणि विरारहून नवी मुंबई विमानतळावर कसं पोहोचायचं? किती वेळ लागतो, बेस्ट पर्याय कोणता?

Last Updated:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू, ३० विमानांचं उड्डाण. अटल सेतू, वाशी खाडी पूल, ठाणे-बेलापूर रोडसह ७ प्रमुख मार्ग प्रवाशांसाठी जाहीर.
advertisement
1/8
ठाणे, कल्याण आणि विरारहून नवी मुंबई विमानतळावर कसं पोहोचायचं? किती वेळ लागतो
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू झालं आहे. 30 विमानांचं उड्डाण होणार आहेत. तर फेब्रुवारीपासून व्यवस्थित पूर्णवेळ सुरू होतील. तिथे जाण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांना रस्ते मार्ग हा सर्वात सोयीचा पर्याय ठरत आहे. विमानतळ प्रशासनाने विविध शहरांतून येणाऱ्या लोकांसाठी ७ प्रमुख मार्गांची सविस्तर माहिती दिली आहे, ज्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करता येईल.
advertisement
2/8
मुंबई शहर : मुंबई शहरातून, विशेषतः वरळी भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 'अटल सेतू' हा सर्वात वेगवान दुवा ठरणार आहे. वरळीवरून प्रवासाला सुरुवात करून फ्रीवे आणि त्यानंतर अटल सेतूगाठावा लागेल. तिथून पुढे उलवे-बेलापूर रोडने थेट विमानतळावर पोहोचता येईल. हे साधारण ३५ किमीचे अंतर कापण्यासाठी ७० मिनिटे लागतील.
advertisement
3/8
पूर्व उपनगरे मार्ग: पवई आणि आसपासच्या भागातून येणाऱ्या प्रवाशांनी पूर्व मुक्त महामार्ग आणि वाशी खाडी पुलाचा वापर करावा. या मार्गावरून पुढे ठाणे-बेलापूर रोड आणि बेलापूर-उलवे रोडने विमानतळ गाठता येईल. पवई ते विमानतळ हे ३४ किमीचे अंतर असून यासाठी ७० मिनिटांचा वेळ अपेक्षित आहे.
advertisement
4/8
ठाणे शहर: ठाणेकरांसाठी विवियाना मॉल हा मुख्य स्टार्टिंग पॉईंट असून मुळुंद-ऐरोली मार्ग सर्वात सोयीचा ठरेल. पूर्व मुक्त महामार्गावरून मुळुंद-ऐरोली रोड, ठाणे-बेलापूर रोड आणि शेवटी बेलापूर-उलवे रोडने प्रवास करावा. ३४ किमीच्या या प्रवासासाठी साधारण ६० मिनिटे लागतील.
advertisement
5/8
पश्चिम उपनगरं: गोरेगावमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग थोडा लांबचा आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जेव्हीएलआर (JVLR), पूर्व मुक्त महामार्ग आणि वाशी पुलावरून ठाणे-बेलापूर व बेलापूर-उलवे रोडने जावे लागेल. हे ४५ किमीचे अंतर असून प्रवासाला ९५ मिनिटे लागतील. मात्र, सांताक्रूझ, विलेपार्ले आणि अंधेरीतील प्रवाशांना मुंबई विमानतळच जवळ पडत असल्याने, त्यांनी स्वस्त विमान तिकीट किंवा जलद सेवा असेल तरच या मार्गाचा विचार करावा.
advertisement
6/8
मिरा रोड मार्ग: मिरा-भाईंदर पट्ट्यातील बेव्हरली पार्क येथून येणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर रोडचा वापर करावा लागेल. तिथून पुढे ठाणे-बेलापूर रोड आणि बेलापूर-उलवे रोडने प्रवास करावा. हे ५० किमीचे सर्वाधिक अंतर असून प्रवासासाठी साधारण १३५ मिनिटे (२ तास १५ मिनिटे) लागू शकतात.
advertisement
7/8
नवी मुंबई (अंतर्गत मार्ग: नवी मुंबईकरांसाठी वाशी हे मुख्य केंद्र असून पाम बीच रोडवरून प्रवासाची मुभा आहे. पाम बीच रोड आणि बेलापूर-उलवे रोडने अवघ्या १४ किमीचे अंतर ३० मिनिटांत पार करता येईल. ऐरोली-बेलापूरचे रहिवासी ठाणे-बेलापूर रोडचा वापर करू शकतात, तर खारघर-पनवेलमधील नागरिकांनी सायन-पनवेल हायवे आणि कळंबोली सर्कलवरून पनवेल-उरण रोडचा पर्याय निवडावा.
advertisement
8/8
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर मार्ग: या पट्ट्यातील प्रवाशांनी कल्याण जंक्शन येथून शिळफाटा मार्ग धरावा. तिथून सायन-पनवेल हायवे आणि उलवे-बेलापूर रोडने विमानतळावर पोहोचता येईल. हे ३७ किमीचे अंतर असून वाहतूक कोंडीमुळे १२० मिनिटे (२ तास) लागू शकतात. शिळफाटा ते कळंबोली सर्कल आणि तिथून पनवेल-उरण रोड हा पर्यायी मार्गही सारख्याच वेळेत उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
ठाणे, कल्याण आणि विरारहून नवी मुंबई विमानतळावर कसं पोहोचायचं? किती वेळ लागतो, बेस्ट पर्याय कोणता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल