TRENDING:

दोन्ही एनसीपी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार, नेते विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य,VIDEO

पुणे

राज्यात महानगर पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.त्यातच आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत असे समजले असता, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, "लोकांमध्ये संभ्रमासारखी अवस्था झालीय. पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय दोनही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. ते एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही.आम्ही स्वतंत्र लढू"

Last Updated: Dec 25, 2025, 14:53 IST
Advertisement

दहाव्या मजल्यावरुन कोसळला व्यक्ती अन् आठव्या मजल्यावरच्या जाळीत अडकला,अग्निशमन दलाकडून रेस्क्यू,VIDEO

Viral

गुजरातमधील सुरतच्या रांधेर परिसरातील टाइम गॅलक्सी इमारतीमधून एक व्यक्ती दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला.पण नशीबाने त्याचा आठव्या मजल्यावरच्या जाळीत पाय अडकला. अग्निशमन दलाला कळवताच त्याला अग्निशमन दलाकडून रेस्क्यू करण्यात आले.

Last Updated: Dec 25, 2025, 16:55 IST

सोळा सोमवारचं व्रत करताच मिळेल मनासारखा जोडीदार... कसं करावं व्रत? ज्योतिषींनी सांगितली योग्य पद्धत

पुणे

पुणे : हिंदू धर्मात उपवास करण्याचे मोठे महत्त्व आहे. यामध्ये सोळा सोमवार हे  शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे मानले जाते. सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दुःख-दारिद्र्य-रोगराई जाण्यासाठी, मनातील कोणतीही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी लोक हे 16 सोमवारचे व्रत म्हणजे उपवास करतात. त्यामुळे हे 16 सोमवारचे व्रत करत असताना पूजा कशी करावी, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Last Updated: Dec 25, 2025, 16:51 IST
Advertisement

पांडेंच्या पक्षप्रवेशाला आमदार फरांदेंचा (भाजप) आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध, VIDEO

नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठाचे नेते विनायक पाडेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे.भाजपच्या मुळ कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष पक्ष वाढवण्यासाठी काम केले आहे. पण आता विनायक पांडे भाजप पक्ष प्रवेश करणार आहेत.त्यामुळे या सगळ्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा विरोध सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Last Updated: Dec 25, 2025, 16:35 IST

संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार, नेमकं काय म्हणाले राऊत ? VIDEO

पत्रकारांसोबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघात प्रहार केला होता. तेव्हा शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत म्हणाले, "शिंदेंनीही स्वतःची मुले सांभाळावीत. भाजप त्यांचीही पोरं पळवणार आहेत."

Last Updated: Dec 25, 2025, 16:10 IST
Advertisement

600 आदिवासी महिलांना मिळाला रोजगार, मेळघाटमध्ये रानआवळ्यापासून कसा बनवला जातोय च्यवनप्राश? Video

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घनदाट जंगलात नैसर्गिकरित्या उगवणारा रानआवळा भरपूर प्रमाणात आहे. आता तो रानआवळा केवळ जंगलातील फळ न राहता आरोग्यसंवर्धन आणि आदिवासी महिलांच्या रोजगाराचा मजबूत आधार ठरत आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप तसेच वातविकारांवर उपयुक्त ठरणाऱ्या रानआवळ्यापासून पहिल्यांदाच मेळघाटात च्यवनप्राश निर्मितीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी महिलांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध झाला आहे.

Last Updated: Dec 25, 2025, 15:59 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
दोन्ही एनसीपी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार, नेते विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य,VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल