Diabetes : 'या बिया आहारात असू द्या', डायबेटिज तज्ज्ञांनी सांगितलं शुगर कंट्रोलची सोपी ट्रिक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diabetes Sugar Control Tips : डायबेटिज तज्ज्ञ डॉक्टरांनी अशा बियांबाबत सांगितलं आहे, ज्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते. या बियांचा आहारात समावेश करा, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
1/5

डायबेटिज रुग्णांना आहाराबाबत बरीच काळजी घ्यावी लागते. काय खायचं, काय नाही हे लक्षात ठेवायला लागतं. कारण याचा शुगरवर परिणाम होतो. काही पदार्थ ज्याने शुगर वाढते तर काही पदार्थ ज्याने शुगर कमी होते, तर काही पदार्थ ज्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते.
advertisement
2/5
डायबेटिज तज्ज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी अशा बियांबाबत सांगितलं आहे, ज्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते. डॉ. भाग्येश म्हणाले, कोणत्याही बीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे प्रोटिन. त्याच्यामुळे त्याची इतकी वाढ होते. कोणतंही बी लावलं की त्या छोट्याशा बीमध्ये इतकी ताकद असते की त्याचं मोठं झाड होतं आणि त्या झाडाला पुन्हा फळ येतं.
advertisement
3/5
पण बिया जास्त प्रमाणात खाऊ नका. आलटून पाटलटून एक चमचाभर बिया खायच्या. ड्रायफ्रुट्सच्या दुकानात तुम्हाला या बिया मिळतील. रोस्टेड म्हणजे भाजलेले चालतील. पण जास्त नमकीन असतील ते खाऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
advertisement
4/5
तुम्ही जवसाच्या चटणीत या बिया मिक्स करू शकता, सलाड-स्मूथीमध्ये टॉपिंग म्हणून वापरू शकता. बडीशेपमध्ये मिक्स करून खाऊ शकता, असं ते म्हणाले.
advertisement
5/5
काही ठिकाणी ड्रायफ्रुट्ससोबत हे सीड्स मिक्स करून मिळतात सीड्समधून प्रोटिन आणि मिनरल्स मिळतात. तर ड्रायफ्रुट्समधून चांगल्या प्रकारचं हेल्दी फॅट मिळतं, असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Diabetes : 'या बिया आहारात असू द्या', डायबेटिज तज्ज्ञांनी सांगितलं शुगर कंट्रोलची सोपी ट्रिक