TRENDING:

सावंतवाडीची लाकडी खेळणी, दादरमध्ये खरेदी करा फक्त 60 रुपयांपासून

Last Updated:
सावंतवाडी म्हटलं की लाकडी खेळणी लगेच आठवतात. आता ही सुंदर आणि टिकाऊ लाकडी खेळणी मुंबईत अगदी कमी दरात मिळू शकतात.
advertisement
1/6
सावंतवाडीची लाकडी खेळणी, दादरमध्ये खरेदी करा फक्त 60 रुपयांपासून
सावंतवाडी म्हटलं की लाकडी खेळणी, गंजिफा पत्ते आणि आंब्याच्या लाकडापासून बनवलेल्या वस्तू आपल्याला लगेच आठवतात. आता ही सुंदर आणि टिकाऊ लाकडी खेळणी मुंबईतील दादरमधील बाजारपेठेत अगदी कमी दरात मिळू शकतात.
advertisement
2/6
दादरमध्ये "नेचर हूड" या स्टॉलवर सावंतवाडीतील पारंपरिक लाकडी खेळणी आणि इतर वस्तू उपलब्ध आहेत. याची किंमत 60 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
3/6
मुंबईतील दादर भागात स्मित हास्य यांकडून ग्राहक पेट भरवण्यात आलेली आहे, ह्या ग्राहक पेठमध्ये सावंतवाडी येथील नेचर हुड करून स्टॉल आहे. या स्टॉलमध्ये सावंतवाडीतून बनवून आणलेल्या खेळणी आणि किचन साठी लागणारे साहित्य अगदी कमी दरात मिळतात.
advertisement
4/6
या स्टॉलवर 60 रुपयांपासून सुरू होणारी भिंगरी, खुळखुळा, 120 रुपयांपासून लाकडी गोळा, डमरू, आणि 350 रुपयांपर्यंत करंजी साचे मिळतात. यासोबतच लाकडाच्या शोपीससाठी देवाच्या मूर्ती, गाड्या आणि विविध अँटिक पीसेस देखील इथे उपलब्ध आहेत.
advertisement
5/6
या दुकानात खेळणी तसेच शोपीसमध्ये लागणाऱ्या देवांच्या मूर्ती मिळतात. तसेच गाडी अशी विविध अँटिक पीस लाकडांच्या वस्तू या दुकानात मिळतात.
advertisement
6/6
जर तुम्हाला अशीच लाकडी खेळणी, जेवनाची भांडी, लाकडी शोपीस पाहिजे असेल तर दादरमधील नेचर हूड या दुकानाला नक्की भेट द्या. या वस्तूंची खरेदी करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
सावंतवाडीची लाकडी खेळणी, दादरमध्ये खरेदी करा फक्त 60 रुपयांपासून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल