TRENDING:

Mumbai Rain: मान्सूनचा जोर ओसरणार, आज पुन्हा हवा बदलणार, मुंबई, ठाण्यातील हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: कोकणातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. सोमवारी सर्वत्र पावसाने हजेली लावली आज मात्र मुंबईसह काही भागात पावसाचा जोर ओसरणार आहे.
advertisement
1/5
Mumbai Rain: मान्सूनचा जोर ओसरणार, आज पुन्हा हवा बदलणार, मुंबई, ठाण्यातील हवामान
मागील दोन दिवसांत कोकण किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार सरी पडल्या. मात्र आज, 15 जुलै रोजी, कोकण विभाग आणि मुंबई उपनगरांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागांत सकाळी मुसळधार सरी अनुभवायला मिळू शकतात, पण दिवसभरात वातावरण मुख्यत दमट व उष्ण राहणार आहे.
advertisement
2/5
मुंबई शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागांत रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत. सकाळी अंधेरी, कुर्ला, दादर, मालाड परिसरात हलका पाऊस झाला असून, दुपारी थोडक्यावेळासाठी सरींचा जोर वाढू शकतो. मात्र दिवसभरात विशेष मुसळधार पावसाचा अंदाज नाही. शहरात कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 25°C दरम्यान राहणार आहे. दमट हवामानामुळे नागरिकांना उकाडा जाणवू शकतो.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरातही आज संपूर्ण दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. ठाण्यात डोंबिवली, कल्याण, भिवंडी या भागात रिमझिम स्वरूपात पाऊस सुरू आहे. नवी मुंबईत वाशी, नेरूळ आणि बेलापूर परिसरात सकाळी ढगाळ वातावरण होते, काही वेळेसाठी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या भागात विजांच्या कडकडाटाचा विशेष इशारा नसला तरी, सायंकाळी काही भागांत जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून दमट व अंशत: ढगाळ वातावरण आहे. वसई, बोईसर, डहाणू आणि जव्हार या भागात सकाळी रिमझिम पावसाच्या सरी सुरू आहेत.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या भागात दिवसभर हलका पाऊस सुरू राहणार असून, काही ठिकाणी दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता आहे. मच्छीमारांसाठी समुद्रात जाण्याबाबत विशेष दक्षतेचा इशारा देण्यात आलेला नाही.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीत, विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये हीच परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. सकाळपासून मुसळधार असून, दिवसभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा फटका कायम राहण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: मान्सूनचा जोर ओसरणार, आज पुन्हा हवा बदलणार, मुंबई, ठाण्यातील हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल