Mumbai Rain: मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार की आज उघडीप? हवामान विभागाकाडून महत्त्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: कोकणातील मान्सूनचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

कोकण किनारपट्टीवर मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. 16 जुलै रोजी देखील काही भागांत विजांसह जोरदार सरी कोसळल्या. मात्र, आज 17 जुलै रोजी कोकणासह मुंबई परिसरात पावसाने थोडी विश्रांती घेतली असून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. आकाश पुन्हा एकदा ढगाळ राहणार असून वातावरणात उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. सकाळच्या सुमारास काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. दुपारी व सायंकाळी पुन्हा हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम उपनगरांत अंधेरी, बोरिवली, मालाड परिसरात पावसाचा जोर थोडाफार जाणवू शकतो. मुंबईत कमाल तापमान 30 अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता असून उष्णता व दमटपणा जाणवेल.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईत आज दिवसभर हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. कल्याण, डोंबिवली, घोडबंदर, वाशी, बेलापूर आणि नेरूळ भागांत दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि तुरळक पावसाच्या सरी संभवतात. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. दमट हवामानामुळे उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. डहाणू, तलासरी, वसई-विरार या भागांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. पावसाचा जोर बुधवारच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे, मात्र काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आजचे कमाल तापमान 30 अंश आणि किमान 25 अंश राहील. .
advertisement
5/5
कोकणात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. महाड, चिपळूण, खेड, मालवण या ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी वातावरण आर्द्र आणि दमट राहील. येथील कमाल तापमान 29 अंश आणि किमान 24 अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार की आज उघडीप? हवामान विभागाकाडून महत्त्वाचं अपडेट