TRENDING:

Dana Cyclone: 153 ट्रेन रद्द, मंदिरात दर्शन बंद, 2 दिवस सरकारकडून हायअलर्ट

Last Updated:
सायक्लोनिक सर्क्युलेशननंतर दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार ते झारखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
Dana Cyclone: 153 ट्रेन रद्द, मंदिरात दर्शन बंद, 2 दिवस सरकारकडून हायअलर्ट
दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओडिशा भागात हायअलर्ट देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीलगतच्या भागांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात हायअलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/7
दाना चक्रीवादळामुळे कोलकाता लोकल ट्रेनच्या वेगाला ब्रेक लागला आहे. गुरुवार 24 रोजी रात्री 8 नंतर सियालदह स्थानकावरून एकही ट्रेन सुटणार नाही.पूर्व रेल्वेचे सीपीआरओ कौशिक मित्रा यांनी सांगितले की, दाना वादळामुळे 24 तारखेला रात्री ८ नंतर एकही ट्रेन सुटणार नाही.
advertisement
3/7
सुरक्षेच्या कारणास्तवर सरकारने पश्चिम बंगाल आणि ओडिशातील ज्या भागांमध्ये हायअलर्ट आहे तिथल्या शाळा महाविद्यालयं आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
advertisement
4/7
पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये चक्रीवादळाचं सावट आहे. त्याचं रौद्र रुप पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांसाठी कोणार्क मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
5/7
दक्षिण पूर्व रेल्वेनं 152 ट्रेन रद्द केल्या आहेत. 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी कोणत्याही ट्रेन या भागांमध्ये धावणार नाहीत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
6/7
ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. चक्रीवादळ दाना 25 ऑक्टोबरला सकाळी लँडफॉल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी, वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर असू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
सायक्लोनिक सर्क्युलेशननंतर दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार ते झारखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील सहा जिल्हे - उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, हावडा, हुगळी, पूर्व मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूर - चक्रीवादळ 'दाना' साठी हाय अलर्टवर आहेत. हे वादळ 24-25 ऑक्टोबर रोजी ओडिशातील पुरी आणि पश्चिम बंगालमधील गंगा सागर दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Dana Cyclone: 153 ट्रेन रद्द, मंदिरात दर्शन बंद, 2 दिवस सरकारकडून हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल