TRENDING:

Gold Rate : सोन्याचे दर वाढले आता पुढे...; 'भारतीय नास्त्रेदामस'ने सांगितलं भविष्यात काय होणार

Last Updated:
Gold Price Prediction : इंडियन नास्त्रेदामस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ऋषीने सोन्याचे दर इतके वाढणार की ते परवडणार नाही, असं 400 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं. ही भविष्यवाणी आता खरी ठरली आहे. त्यांनी त्यानंतरची परिस्थितीही सांगितली, जी आता खरी ठरते की काय, अशी भीती लोकांना वाटू लागली आहे.
advertisement
1/7
सोन्याचे दर वाढले आता पुढे...; भारतीय नास्त्रेदामसने सांगितलं भविष्यात काय होणार
गेल्या वर्षभरापासून सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. जागतिक बाजारपेठेतील चढउतार आणि गुंतवणूकदारांच्या पसंतींचा देशांतर्गत बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना सोन्याचे दागिने खरेदी करणं अशक्य होत चाललं आहे. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
advertisement
2/7
सोन्याच्या दागिन्यांना लग्नात विशेष महत्त्व असतं. इतर कोणतेही दागिने कोणत्याही धातूचे चालतील पण लग्नात मंगळसूत्र मात्र सोन्याचं हवं. लग्नात सोन्याची थाळी किंवा वाटी घालण्याची खूप जुनी परंपरा आहे. पण आता सोन्याचे दर पाहता ही परंपरा चालू ठेवणं कठीण दिसतं. शिवाय तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात दहा ग्रॅम सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
सोन्याचे दर वाढणार हे तर सगळेच सांगत आहे पण सोनं वाढलं आता पुढे काय असा प्रश्न कित्येकांना पडला आहे. पण याच्या पुढील भाकीत इंडियन नास्त्रेदामस म्हणून ओळखले जाणारे 17 व्या शतकातील भारतीय संत पोतुलुरी वीरब्रह्मम यांनी. तेलुगू राज्यांमध्ये ते खूप प्रसिद्ध आहेत.
advertisement
4/7
पोतुलुरी वीरब्रह्मम यांनी ब्रह्मम् गारी कलाग्ननम् हे तेलगु भाषेत पुस्तक लिहिलं. या पुस्तकात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याच्या भाकितांचा उल्लेख आहे. लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या कलाज्ञानममध्ये सांगितलेल्या गोष्टी आज खऱ्या ठरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सोन्याबाबतची भविष्यवाणी जी आज खरी ठरताना दिसत आहे.
advertisement
5/7
न्यूज18 तेलुगूच्या वृत्तानुसार त्यांनी भाकीत केले होतं की भविष्यात असा काळ येईल जेव्हा सोनं इतकं महाग होईल की ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाईल. आज तेच घडतं आहे. पोतुलुरी यांनी यापुढचीही भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले, महिला सोन्याऐवजी लाकडी थाल किंंवा मंगळसूत्र घालावं लागू शकतं. 
advertisement
6/7
सोन्याच्या वाढत्या किमतीची खरी ठरलेली भविष्यवाणी पाहता जनतेमध्ये आता पोतुलुरी यांनी सांगितलेलं पुढचं भाकीत लवकरच खरं ठरतंय की काय अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.
advertisement
7/7
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Gold Rate : सोन्याचे दर वाढले आता पुढे...; 'भारतीय नास्त्रेदामस'ने सांगितलं भविष्यात काय होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल