TRENDING:

प्रवाशांनी खचाखच भरले होते प्लॅटफॉर्म, दीड लाख लिटरची टाकी कोसळली...अन् घडला अनर्थ!

Last Updated:
13 डिसेंबरच्या दुपारी संपूर्ण देश हादरला. एकामागून एक मोठ्या दुर्घटना समोर आल्या. संसदेत लोकसभागृहाच्या चालू कामकाजात अज्ञातांनी उड्या घेतल्या आणि एकच गदारोळ झाला. मुंबईतल्या वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर भीषण आग लागली. तर, याच दिवशी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी पश्चिम बंगालच्या बर्धमान रेल्वे स्थानकावर मोठा अपघात घडला. यात 3 जणांनी आपला जीव गमावला, तर जवळपास 28जण जखमी झाले.
advertisement
1/7
प्रवाशांनी भरले होते प्लॅटफॉर्म, लाखो लिटरची टाकी कोसळली,अन् घडला अनर्थ
भरदुपारी प्रवासी घामाघूम होऊन बर्धमान रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत होते. सर्व प्लॅटफॉर्म प्रवाशांनी खचाखच भरले होते. तेवढ्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 2-3 दरम्यान पाण्याची टाकी (Overhead water tank) कोसळली आणि घोळक्याच्या किंचाळण्याचा भयंकर आवाज झाला. या टाकीखाली अनेक प्रवासी दबले गेले. नेमकं घडलं काय, हे कळण्याच्याही मन:स्थितीत ते नव्हते.
advertisement
2/7
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर जखमी प्रवाशांना बर्धमान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
advertisement
3/7
महत्त्वाचं म्हणजे जे प्रवासी या दुर्घटनेत वाचले, त्यांनी इतर अनेक प्रवासी टाकीखाली दबले गेल्याचं पाहून आपल्यालाही इजा होऊ शकते, असा विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी धडपड सुरू केली.
advertisement
4/7
प्रवाशांनी बचावकार्य सुरू केल्यानंतर पोलीस अग्निशमन दलाच्या काही गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जवळपास 30 प्रवाशांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु दुर्दैवानं डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं. मृत प्रवाशांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
advertisement
5/7
बर्धमान रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 दरम्यान जी पाण्याची टाकी (Overhead water tank) होती, त्यात साधारण दीड लाख लिटर पाणी होतं. ही टाकी या दोन प्लॅटफॉर्मच्या ओव्हरब्रिजला जोडलेली होती.
advertisement
6/7
दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येनं प्रवासी गाडीची वाट पाहत असताना अचानक पाण्याची टाकी ओव्हरब्रिजच्या छतासह खाली कोसळली. हा भार एवढा होता की, त्यामुळे रूळही तुटले. या घटनेच्या नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा येतोय. दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाहीये.
advertisement
7/7
दुर्घटनेनंतर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. काही तासांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 4 वरून वाहतूक सुरू करण्यात आली. तर, रेल्वे प्रशासनानं या दुर्घटनेच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती नेमली आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
प्रवाशांनी खचाखच भरले होते प्लॅटफॉर्म, दीड लाख लिटरची टाकी कोसळली...अन् घडला अनर्थ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल