PM Modi in Ayodhya : लोकसभा निवडणुकीआधी PM मोदी रामलल्लाच्या दर्शनाला; म्हणाले 140 कोटी भारतीय..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
PM Modi in Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात पोहचले. त्यांनी 140 कोटी जनतेसाठी प्रार्थना केल्याचं सांगितलं.
advertisement
1/6

देशभरात मंगळवारी 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
advertisement
2/6
या मतदारसंघासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी पोहचले.
advertisement
3/6
अयोध्येत, माझ्या 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी प्रभू श्रीरामांची प्रार्थना केली, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन करण्यात आले.
advertisement
4/6
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी राम मंदिरासह संपूर्ण अयोध्या शहर सजवण्यात आले आहे. भव्य सजावटीसह मंदिराचे गेट फुलांनी सजवले आहे.
advertisement
5/6
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या शहरातील चौकाचौकात भाजप आणि पंतप्रधान मोदींचे झेंडे घेऊन कार्यकर्ते उभे होते.
advertisement
6/6
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. राम लल्लाच्या दर्शनासोबतच पंतप्रधान मोदी अयोध्येत लोकसभा निवडणुकीसंदर्भात संध्याकाळी होणाऱ्या भव्य रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
PM Modi in Ayodhya : लोकसभा निवडणुकीआधी PM मोदी रामलल्लाच्या दर्शनाला; म्हणाले 140 कोटी भारतीय..