TRENDING:

PHOTOS : रामपूरच्या नवाबाजवळ होती स्वत:ची रेल्वे, होती शाही व्यवस्था, जशी की 5 स्टार हॉटेलच

Last Updated:
उत्तरप्रदेशातील रामपूरचे नवाब प्रसिद्ध होते. तेथील नवाबाची रेल्वे लाईन जवळपास 40 किलोमीटर लांब होती. त्यांची ही खासगी रेल्वे रामपूरते मिलक दरम्यान चालायची. या रेल्वेला एकूण चार बोगी होत्या. एक डब्बा नवाबसाठी होता. यामध्ये जेवणाची व्यवस्था, बेडरूम, बाथरूम अशा सर्व सुविधा होत्या. याशिवाय ट्रेनमध्ये स्वयंपाकघरही होते. (अंजू प्रजापति, प्रतिनिधी, रामपूर)
advertisement
1/9
PHOTOS : रामपूरच्या नवाबाजवळ होती स्वत:ची रेल्वे, होती शाही व्यवस्था, जशी की 5..
1925 मध्ये रामपूरचे नवाब हामिद अली खांने आपल्या खासगी उपयोगासाठी चार बोगी खरेदी केल्या होत्या, तेव्हा 40 किमी लंबी रेल्वे लाईन तयार करण्यात आली होती. या शाही रेल्वेत 5 स्टार हॉटेल सारखी व्यवस्था होती.
advertisement
2/9
बेगम नूर बानो यांनी सांगितले की, हामिद अली खां यांनी हे स्‍टेशन बनवले होते.
advertisement
3/9
यानंतर नवाब रजा अली खां यांनी याचा वापर केला. याच रेल्वेत रामपुरहून जयपुर येथे लग्नाची वरात गेली होती.
advertisement
4/9
आता माझ्या लग्नाला जवळपास 70 वर्षे झाली आहेत. आम्ही जिथे या रेल्वेने जायचो, जागोजागी थांबायचो. या रेल्वेत प्रवास करताना एक वेगळाच आनंद यायचा.
advertisement
5/9
रामपुरचे नवाब हामिद अली खां यांना दिल्ली किंवा लखनऊ यावे-जावे लागायचे. तेव्हा ते या आपल्या खासगी शाही रेल्वेने प्रवास करायचे.
advertisement
6/9
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या रेल्वेने प्रवास सुरू होता. मात्र, सरकारी नियमांमुळे या रेल्वेच्या प्रवासाला मनाई करण्यात आली.
advertisement
7/9
आज या रेल्वेच्या बोगींची चमक फिकी पडली आहे. बोगीचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत.
advertisement
8/9
माहितीनुसार, 1954 साली नबावाने आपल्या रेल्वेच्या दोन बोगी भारत सरकारला देऊन टाकल्या होत्या.
advertisement
9/9
तर जोपर्यंत नवाब रजा अली खान हे जिवंत होते, त्यांनी उरलेल्या दोन बोगीतून प्रवास केला. त्यांचे निधन हे 1966 मध्ये झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
PHOTOS : रामपूरच्या नवाबाजवळ होती स्वत:ची रेल्वे, होती शाही व्यवस्था, जशी की 5 स्टार हॉटेलच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल