TRENDING:

सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, घटना FB लाइव्हमध्ये कैद; घटनास्थळावरचे PHOTO आले समोर

Last Updated:
हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांच्यासमोरच क्रॅश झालं. हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत. या हेलिकॉप्टरमधून पायलटला सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
advertisement
1/5
सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, घटना FB लाइव्हमध्ये कैद; PHOTO समोर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधी हा अपघात झाल्यानं त्या सुखरूप आहेत.
advertisement
2/5
हेलिकॉप्टर क्रॅश कशामुळे झालं याचं कारण समोर आलं नाहीय. दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. दोन्ही पायलट सुखरुप आहेत.
advertisement
3/5
सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधी हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्या महाडमधून बारामतीला जाणार होत्या. त्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं.
advertisement
4/5
हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांच्यासमोरच क्रॅश झालं. हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत. या हेलिकॉप्टरमधून पायलटला सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
advertisement
5/5
हेलिकॉप्टर क्रॅशनंतर सुषमा अंधारे यांनी आपण सुखरुप असल्याचं सांगितलं. माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी असं त्यांनी म्हटलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, घटना FB लाइव्हमध्ये कैद; घटनास्थळावरचे PHOTO आले समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल