TRENDING:

Maruti Ertiga पेक्षा भारीही टोयोटाची 7 सीटर कार, आता Tata ला सुद्धा फोडला घाम, रिपोर्ट समोर

Last Updated:
मारुती सुझुकीच्या लोकप्रिय एर्टिगा या ७ सीटर एमपीव्हीला टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस चांगलीच टक्कर देते.  इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (BNCAP) ने टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचा क्रॅश टेस्ट रिपोर्ट समोर आला आहे.
advertisement
1/7
Maruti Ertiga पेक्षा भारीही टोयोटाची 7 सीटर कार, आता Tata ला सुद्धा फोडला घाम
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या स्वस्त आणि मायलेजमध्ये किंग असल्याचा बहुमान मिरवत असते. पण सेफ्टीच्या बाबतीत अजूनही मारुती सुझुकीला संघर्ष करावा लागत आहे. अशातच मारुती सुझुकीच्या लोकप्रिय एर्टिगा या ७ सीटर एमपीव्हीला टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस चांगलीच टक्कर देते.  इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (BNCAP) ने टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचा क्रॅश टेस्ट रिपोर्ट समोर आला आहे.
advertisement
2/7
यामध्ये हायक्रॉस ही पहिली टोयोटा आणि इंडिया NCAP द्वारे क्रॅश टेस्ट केलेली पहिली MPV बनली आहे. या MPV ने क्रॅश टेस्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. ही क्रॅश टेस्ट या वर्षी एप्रिलमध्ये घेण्यात आली होती, ज्यामध्ये हायक्रॉसच्या 8-सीटर, VX 8-सीटर, SHEV आणि ZX 7-सीटर SHEV प्रकारांचा समावेश होता. याचा अर्थ असा की हे रेटिंग इनोव्हा हायक्रॉसच्या संपूर्ण श्रेणीला लागू होते.
advertisement
3/7
49 पैकी 45 गुण - इनोव्हा हायक्रॉसने अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) साठी 32 पैकी 30.47 आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) साठी 49 पैकी 45 गुण मिळवले. यामध्ये ISOFIX अँकर आणि शिफारस केलेल्या चाइल्ड रिस्ट्रेंट सपोर्टमुळे 24 पैकी 24 डायनॅमिक स्कोअर समाविष्ट आहे.
advertisement
4/7
फ्रंट सेफ्टी - एओपीमध्ये वाहनाने फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये १६ पैकी १४.४७ गुण मिळवले. डोके आणि पाय यासारख्या बहुतेक शरीराच्या भागांना 'चांगले' सुरक्षा रेटिंग मिळाले, तर ड्रायव्हरच्या छाती आणि डाव्या टिबियाला 'फेअर' रेटिंग मिळालं. साईड मुव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये इनोव्हा हायक्रॉसने पूर्ण १६ गुण मिळवले. ज्यामध्ये शरीराच्या सर्व भागांना 'चांगलं' संरक्षण रेटिंग मिळालं. एमपीव्हीने साइड पोल इम्पॅक्ट टेस्ट देखील उत्तीर्ण केली, जिथे त्याला 'फेअर' रेटिंग मिळालं.
advertisement
5/7
५ स्टार सेफ्टी रेटिंग - चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन कॅटेगरीत, इनोव्हा हायक्रॉसने ४९ पैकी ४५ गुण मिळवले, ज्यामुळे त्याला ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. डायनॅमिक टेस्ट (२४/२४) आणि चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टम (सीआरएस) इन्स्टॉलेशन इव्हॅल्युएशन (१२/१२) मध्ये त्याला परिपूर्ण स्कोअर मिळाला. वाहन मूल्यांकन विभागात, एमपीव्हीने १३ पैकी ९ गुण मिळवले. १८ महिने आणि ३ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डमी वापरून चाचण्या घेण्यात आल्या.
advertisement
6/7
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसमध्ये सर्व सीटसाठी ३-पॉइंट सीटबेल्ट, एअरबॅग्जसह सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), पादचारी संरक्षण तंत्रज्ञान, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर आणि मागील पार्किंग सेन्सर्स अशा मानक सुरक्षा फिचर्ससह येते.
advertisement
7/7
इनोव्हा हायक्रॉस AIS-100 पादचारी सुरक्षा मानकांची देखील पूर्तता करते. याशिवाय, टॉप-स्पेक ZX (O) प्रकारात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सूट देखील समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Maruti Ertiga पेक्षा भारीही टोयोटाची 7 सीटर कार, आता Tata ला सुद्धा फोडला घाम, रिपोर्ट समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल